वरपोड येतील करावहीचा नावाने वनविभागाचे अधिकारी कर्मचऱ्यांनी आदिवासी महीलाना मारहाण प्रकरणांची विभागीय चौकशी ची मागणी

0
614

वरपोड येतील करावहीचा नावाने वनविभागाचे अधिकारी कर्मचऱ्यांनी आदिवासी महीलाना मारहाण प्रकरणांची विभागीय चौकशी ची मागणी

 

 

Impact 24 news

तालुका प्रतिनिधी

पुरुषोत्तम गेडाम

 

यवतमाळ/झरी जामणी :-

मुकुटबन पोलिस स्टेशन मध्ये विविध कलमान्वेय आदिवासी महीलावरील दाखल गुन्हे मागे घ्या.

 

 दयाकर गेडाम परधान समाज संघटना अध्यक्ष झरी यांची मागणी.

 

आज दिनांक २४ जुन २०२१ ला दुपारी ३ च्या दरम्यान परधान समाज सघटणा शाखा झरीच्या वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असुन दिनांक २९ जुन २०२१ रोजी पहाटे ५.३० ला वनविभागाने व पोलीस यांचे संयुक्त पथक मिळून गर्भवती वाघीण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली वरपोड येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले असता कार्यवाहीच्या नावाखाली तेथील महिला व पुरुष याना अमानुष मारहाण करण्यात आली. या मध्ये सात ते दाहा महिलां गभीर जखमी झाल्या असुन त्यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर जखमी झालेल्या होते .

या महिलांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय झरी येते आणले असता त्यांच्यावर उपचार सुद्धा व्यवस्थित करण्यात आला नाही. महीला जखमी अवस्थेतच त्याच दिवशी घरी पोहचले. अश्यातच महीलावर वण अधिकारी व कर्मचारी यांनी अन्याय केला आहे. या बद्दल तालुक्यात या अन्यायाच्या विरोधात बऱ्याच संघटना उभ्या ठाकल्या आहे.या सर्व अन्याया विरुद्ध योग्य न्यायाची मागणी पपरधान समाज संघटनांनी निवेदन दिले आहे.या सर्व प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधि अन्वेय कायद्यानुसार नुसार (अट्रोसिटी एक्ट) नुसार सबंधीत अधिकारी, व कर्मचारी यांचेवर गुन्हे नोंदविण्यात यावे. अशी मागणी संघटनेने आपल्या निवेदनातून केली आहे. व झालेल्या प्रकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

 

        संघटनेचे अध्यक्ष दयाकर गेडाम,मनोज गेडाम,राजू सिडाम, पुरूषोत्तम गेडाम,प्रशांत येटे, अनिल पोयाम,बाळू टेकाम,मदन गेडाम, प्रेम सिडाम,प्रभाकर कुमरे,बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here