मिशन कवच कुंडल अभियाना अन्तर्गत लसीकरण कार्यक्रम आयोजित

0
425

मिशन कवच कुंडल अभियाना अन्तर्गत लसीकरण कार्यक्रम आयोजित

 

कोरपना/प्रतिनिधी (१४ ऑक्टो.) : कोरपना आणि कोरपना परिसरातील सर्व नागरिकांकरिता ज्यांचे वेळेअभावी पहिले आणि दुसरे व्हॅक्सिनेशन चे डोस झाले नाहीत त्यांच्याकरिता खास “शारदा महिला मंडळ कोरपना” कडून मिशन कवच कुंडल अंतर्गत लसिकरण कॅम्पचे काल १३ तारखेला आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ६५ महीला-पुरूषांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

सदर अभियान शारदा माता मंदिर वार्ड नंबर ३ येथे सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान पार पडले. आयोजकानी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहनाची सोय केली होती.

कार्यक्रमात विजयराव बावणे, कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार ढाकने, डॉ. शालिनी तरोने, डॉ. दिलीप तम्मलवार व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, शारदा महिला मंडळच्या सर्व भगिनी व इतर मान्यवर हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here