वणी एरियात लाल झेंडा कोल माईन्स मजदूर यूनियन (सीटू) चे अधिवेशन संपन्न

71

वणी एरियात लाल झेंडा कोल माईन्स मजदूर यूनियन (सीटू) चे अधिवेशन संपन्न

घुग्घूस : लाल झेंडा कोल माईन्स मजदूर यूनियन (सीटू) वणी एरियाचे क्षेत्रीय अधिवेशन दिनांक 24 मार्चला टेम्पो क्लब घुग्घूस येथे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.आईं.सी. डब्ल्यू.एफ वैकल्पिक जेबीसीसीआई उपाध्यक्ष एस.एच. बेग,तर प्रमुख पाहुणे वेकोलीचे संचालन समिति अध्यक्ष जगदीश दिगरसे, वेकोली महासचिव जी.रमन्ना, कल्याण समिती सदस्य कामेश्वर राय,कैलाश रोड़े,लक्ष्मी नारायण राठौड उपस्थित होते.

एस.एच.बेग,जगदीश दिगरसे,जी. रमन्ना व कैलाश रोड़े यांनी शेतकरी , शेत मजूर व कामगार यांच्यावर केंद्र सरकार जो अन्याय करीत आहे याबाबत मार्गदर्शन केले.जी.रमन्ना यांनी कोल इंडिया व्यवस्थापन आणि कोल मंत्रालय कडून आता पर्यंत अकराव्या वेतन लागू व्हायला पाहिजे पण हा अकरावा वेतन आयोग लागू करण्यास का उशीर होत आहे याबाबत बाबत सविस्तर माहिती दिली.

या अधिवेशनात वेकोली वणी क्षेत्रात नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली यात कन्वेयर संतोष डे,अध्यक्ष बिनोद बुटले,महासचिव प्रमोद अर्जुनकर,कार्याध्यक्ष गणेश डांगे व कोषाध्यक्ष म्हणून पी.वाई.डाखरे यांची सर्वांनुमते नियुक्ती करण्यात आली.या कार्यक्रमात वेकोलीच्या विविध क्षेत्रातील शंभर सदस्यांनी भाग घेतला होता.या नवव्या अधिवेश नाचे सूत्र संचालन गजेंद्र कुमार, पप्रास्ताविक प्रमोद पानघाटे तर आभार प्रदर्शन एस.जे. विसेन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश डांगे, सतीश गोहे,पी.वाई. डाखरे, राजू सूर्यवंशी, गुलाब आवारी, सुमन सिन्हा दीपक ,सुरेश जेऊरकार प्रशांत ताजने यांनी प्रयन्त केले.

advt