पूर्व सूचना न देता विद्युत वितरण कट करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीचे विरोधात नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी

0
474

पूर्व सूचना न देता विद्युत वितरण कट करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीचे विरोधात नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी


विद्युत वितरण कंपनीचे मनमानी कारभार खपवून घेणार नाही :- आमदार डॉ देवराव होळी

चामोर्शी
विद्युत वितरण कंपनीचे मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे व गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीने सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे व स्थानिक ग्रामपंचायत ने सुद्धा विद्युत बिल न भरल्याने विद्युत वितरण कट करण्याचा पूर्व सूचना न देता विद्युत वितरण कट करण्याचा सपाटा सुरू करून हिटलरशाहिचा परिचय करून देत आहे ,व महाविकास आघाडी सरकार ने विद्युत बिलात कुठलीही सवलत दिली नाही व भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विराट आंदोलन करूनही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केराची टोपली दाखवली
या बद्दल आमदार डॉ देवराव होळी यांनी विद्युत विभागाचा जाहीर निषेध केला व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिक व ग्रामपंचायत व शेतकरी बांधवांना जाहीर आव्हान केले की विद्युत वितरण कंपनीने जर आपले विद्युत वितरण कट करण्या आधी जर पूर्व सूचना दिली नाही तर विद्युत वितरण कंपनी विरोधात नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी व त्याची एक प्रत आमदार जनसंपर्क कार्यालय येथे पाठवावे
व लवकरच पुन्हा या गेंड्याचे कातडे पांघरलेल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात विराट आंदोलन करण्यात येईल व वेळ प्रसंगी विद्युत वितरण कंपनीच्या
अगाऊ अधिकारी यांच्या कानाखाली आवाज सुद्धा काढ्न्यात येईल असा इशाराही आमदार डॉ देवराव होळी यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here