कटाक्ष:कोरोना हे चीनचे तिसरे महायुद्ध? जयंत माईणकर

0
554

कटाक्ष:कोरोना हे चीनचे तिसरे महायुद्ध? जयंत माईणकर


कोरोना हे एक चीनने जगाविरुद्ध तयार केलेलं एक जैविक शस्त्र असं वृत्त ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलं आहे. अर्थात हा आरोप याआधीही झाला आहे.पण यावेळी अमेरिकेन, ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन सूत्रांनी दिलेल्या या बातमीच्या प्रमाणे या जैविक युद्धाची तयारी खूप आधीपासूनच सुरू होती. अगदी २०१५ पासून.
अर्थात जैविक शस्त्रांचा वापर होण्याची भीती तशी नवीन नाही. दुसरे महायुद्ध दोन अणूबॉम्बचा वापर करून संपल्यानंतर गेल्या शतकात अनेक वेळा या जैविक शस्त्रांच्या वापराची शक्यता बोलली गेली.पण कोरियन वॉर, अमेरिका- व्हिएतनाम , भारत -पाकिस्तान , अरब इस्राएल संघर्ष यापैकी कुठेही जैविक शस्त्रे वापरण्यात आली नव्हती. नाही म्हणायला २००३ साली झालेल्या दुसऱ्या गल्फ वॉरच्या वेळेस इराकचे तत्कालीन हुकूमशहा सद्दाम हुसेन यांच्याकडे सर्वविनाशक शस्त्रे (weapons of mass destruction) असल्याचा आरोप सतत केल्या गेला.
अमेरिकेच्या पेंटॅगॉनद्वारे सतत
अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक सर्वविनाशक शस्त्रे इराककडे असल्याचा आरोप तत्कालीन जॉर्ज बुश सरकारने लावून धरला. त्याला इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी पाठिंबाही दिला. पण सद्दामला पदच्युत केल्यानंतर असं कुठलंही शस्त्र सापडलं नसल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ, सीआयए यांनी दिला. पण सध्याची गोष्ट वेगळी आहे.

कोरोना या विषाणूची सुरुवात चीनमध्येच झाली.सध्या या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९०७५८ , बरे झालेले रुग्ण ८५८२२ तर मृत्यू ४७३६.
आज वुहानसह सर्व चीन आज कोरोनाच्या विळख्यातून मुक्त झाला आहे. मात्र
संपूर्ण जगातील कोरोना बाधितांची संख्या १५.८ कोटी, बरे झालेले रुग्ण ९.४४ कोटी तर ३२.९ लाख मृत्यू.
ज्या चीनमध्ये हा विषाणू सापडला त्या १५० कोटीहून जास्त लोकसंख्येच्या देशामध्ये ४७३६ मृत्यू तर संपूर्ण जगात आत्तापर्यंत सुमारे ३५ लाख मृत्यू. त्यातील सुमारे तीन लाख भारतात आहेत.
ज्या सहजपणे चीनने कोरोना वर काबू मिळवला ते पाहूनच चीनच्या एकूण भूमिकेविषयी शंका उत्पन्न होते.

चीनमधून ब्युबोनिक प्लेग, सर्स आणि आता कोरोना यासारखे अनेक रोग उत्पन्न झाले आहेत. जहाजावरील उंदरांच्यामुळे १४ व्या शतकात युरोपात आणि १८व्या भारतात पोहोचलेल्या प्लेगने अक्षरशः करोडो लोकांचे प्राण घेतले कारण त्याकाळी वैद्यकीय तंत्रज्ञान तितकेसे प्रगत नव्हते. २००२ ते ०४ च्या दरम्यान सर्सचे रोगी Severe acute care respiratory syndrome (SARS) जगाच्या काही भागात पाहायला मिळाले.एकूण ७७४ माणसे सर्सनी मेल्याच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. करोना विषाणूबाबत चीनकडून करण्यात आलेल्या दाव्यांना स्वीकारण्यास कोणाचीही तयारी नाही. अशातच चीनकडे पुन्हा एकदा संशयाची सुई वळली आहे.

चीनमध्ये शेकडो नागरिकांचा बळी घेणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा धोका जगाला सर्वात आधी सांगणाऱ्या डॉक्टरचाही करोना व्हायरसमुळेच अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग असं या डॉक्टरचं नाव आहे. एकेकाळी याच डॉक्टरवर अफवा पसरविणारा म्हणून चीनने कारवाई केली होती त्यालाच मरणोत्तर चिनी सरकारकडून मेडल देण्यात आलं.

*करोना विषाणू म्हणजे ‘जैविक शास्त्राचे नवे शस्त्र*

चीनच्या शास्त्रज्ञांनी करोना विषाणूचा वापर एक शस्त्र म्हणून करण्याबाबतची चाचपणी पाच वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. त्यावेळेस तिसरे महायु्द्ध होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला काही दस्ताऐवज मिळाले आहेत.
स्फोटक दस्ताऐवज
ब्रिटनमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने ‘द ऑस्ट्रेलियन’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताचा हवाला दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या हाती स्फोटक दस्ताऐवज लागले आहेत. या दस्ताऐवजानुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) कमांडरकडून ही घातक भीती व्यक्त करण्यात येत होती. हा अहवाल वर्ष २०१५ मध्ये लष्करी शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी हा अहवाल लिहीला होता. हे सर्व जण करोनाच्या उत्पत्ती संबंधात चाचणी करत होते.
करोना विषाणू म्हणजे ‘जैविक शस्त्राचे नवे शस्त्र
चिनी शास्त्रज्ञांनी सार्स करोना विषाणूचा उल्लेख ‘जैविक शस्त्राचे नवे युग’ म्हणून केला होता. पीएलएच्या या दस्ताऐवजात जैविक शस्त्रांद्वारे केलेल्या हल्ल्यातून शत्रूंच्या आरोग्य व्यवस्थेला उद्धवस्त करता येऊ शकते. या दस्ताऐवजात, अमेरिका हवाई दलाचे कर्नल मायकल जे यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनीदेखील तिसरे महायुद्ध जैविक शस्त्राने लढवले जाऊ शकते, अशी शंका व्यक्त केली होती.

*चीनच्या पारदर्शीपणावर चिंता*

दस्ताऐवजांनुसार, चीनमध्ये वर्ष २००३ मध्ये फैलावलेला सार्स देखील एक मानव निर्मित जैविक हत्यार असू शकते. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता या दस्ताऐवजात व्यक्त करण्यात आली. खासदार टॉम टगेनधट आणि ऑस्ट्रेलियातील राजकीय नेते जेम्स पेटरसन यांनी म्हटले की, करोना विषाणूच्या उत्पत्तीमुळे चीनच्या पारदर्शीपणावर प्रश्न निर्माण झाले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने चीनच्या बदनामीसाठी असे वृत्त प्रकाशित केले असल्याचे सांगत ‘द ऑस्ट्रेलियन’वर ताशेरे ओढले आहेत.
आता ज्या पद्धतीने सद्दाम हुसेनला हटवून इराक, कुवेत आणि सौदी अरेबियाच्या पेट्रोलवर आपला वरचष्मा कायम ठेवला त्या पद्धतीने अमेरिका चीनला धडा शिकवणारहे पहायचे.तसही सोव्हिएत युनियननंतर चीन हा अमेरिकेच्या डोळ्यात सलणारा कम्युनिस्ट देश. या संधीचा फायदा घेऊन पाश्चिमात्य लोकशाहीवादी देश चीनविरुद्ध आघाडी उघडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे युद्ध अमेरिकेला तितका सोपं जाणार नाही. अफाट मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान असलेल्या चीनशी गाठ आहे.

 

 

नेपोलियनने त्या देशाला निद्रिस्त राक्षस म्हटले होते! पण ड्रॅगन जागा झाला!आणि ड्रॅगन जागा झाल्यावर…तो सर्व जगाला डसला!
कोरोना विषाणू च्या रूपाने पाहता पाहता या चिनी ड्रगनने ८०० कोटी मानव समूह राहणाऱ्या सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर असलेल्या निळ्या रंगाच्या पृथ्वीला आपल्या कवेत घेतले!

मानव जातीच्या इतिहासात कधीही न झालेला प्रसंग आला. कधीही न आलेली आपत्ती आली. जगातील तीन चतुर्थांश लोक भिऊन घरात बसले तर उर्वरित या विषाणूला निष्क्रिय करण्याच्या मागे लागले.

कोरोना प्रकरणाचा फायदा घेऊन अमेरिका आपल्या प्रबळ शत्रूला संपविण्याचा किंवा तिथली कम्युनिस्ट राजकीय पद्धत बदलून त्या जागी आपल्याला अनुकूल राजकिय पद्धत आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कम्युनिस्ट चीन हा सोव्हिएट युनियन नंतर अमेरिकेला सलणारा काटा! पण सोव्हिएट युनियन प्रमाणे या देशात वांशिक, धार्मिक, भाषिक भिन्नता नसल्याने या मुद्द्यावर फारसे मोठे उठाव झाले नाहीत. आणि जे झाले ते कम्युनिस्ट पक्षाच्या लोखंडी पडद्याआड क्रूरपणे रणगाड्याखाली बीजिंग मधील तायनामॅन चौकात चिरडून टाकले गेले.

चीनची कमी पगारावर काम करायला तयार असलेली अफाट कामगार शक्ति आणि त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत कमी भावात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली विविध उत्पादने! ही एक अमेरिकेला असलेली डोकेदुखी! बाजारपेठेतील चीनची मक्तेदारी मोडून काढण्याची एक आयती संधी कोरोना व्हायरसच्या रूपाने अमेरिकेच्या हातात आल्याचं अनेक तज्ज्ञांच मत आहे. आणि त्यात बरचसं तथ्य आहे.

 

दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सोव्हिएट युनियन आणि अमेरिका या दोन महाशक्तींच शीतयुद्ध ४६वर्षे चाललं. त्यानंतर म्हणजेच सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर गेली २९ वर्षे जागतिक राजकारणात केवळ अमेरिकेचं वर्चस्व आहे.

चीनकडे अमेरिकेचा एक प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून नेहमी पाहिलं गेलं. पण हा प्रतिस्पर्धी उभा राहून अमेरिकेला आव्हान देण्याच्या आधीच त्याच्या आर्थिक नाड्या आवळून त्याला झुकवण्याचा आणि तिथली कम्युनिस्ट राजपद्धती संपविण्याचा प्रयत्न अमेरिका करू शकतो. तसही हॉंगकॉंग, मकाऊ आणि मुस्लिम बहुल झिनियांग तसच तिबेट या प्रांतात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात वातावरण आहेच.

*करोना कधी संपेल?*

याचे स्पष्ट उत्तर म्हणजे नजिकच्या भविष्यकाळात नाही . देवी (Small Pox ) यावर लस मिळाली १७९८ साली आणि देवीचे उच्चाटन झाले त्यानंतर २०० हून जास्त वर्षानी ! तो ही एक विषाणू आहे . पोलिओ ला नष्ट व्हायला ७० पेक्षा जास्त वर्षे लागली . त्यामुळे करोना पूर्ण नष्ट व्हायला खूप वर्षे लागतील . आपले जवळचे लक्ष्य तो आटोक्यात कसा आणता येईल आणि आटोक्यात कसा ठेवता येईल हे असायला हवे आणि आहे . त्यालाही किती दिवस लागतील त्याचा अंदाज करणे कठीण आहे . करोना आपल्याबरोबर खूप दिवस – महिने – वर्षे रहाणार आहे . डेंग्यू आहे , स्वाइनफ्ल्यू आहे , चिकन- गुनिया आहे , कोरोनाला आपण त्यांच्या रांगेत न्यायचा प्रयत्न केला पाहिजे.

 

महान वैज्ञानिक डॉ . आइन्स्टाइन याना एकाने विचारले – ” ” तिसरे महायुद्ध कसे होईल ? ” तेव्हा ते म्हणाले होते – ” तिसऱ्याबद्दल काही सांगू शकत नाही . पण चौथे मात्र दगड आणि धोंडे यानी होईल. कोरोना हे खरंच तिसरं महायुद्ध आहे? तूर्तास। इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here