अत्यावश्यक वाहतुकीसाठी ‘ई-पास’ तर दारू वाहतुकीसाठी ”नो पास” लक्कडकोट चेक पोष्ट वर खुली सूट

0
658

अत्यावश्यक वाहतुकीसाठी ‘ई-पास’ तर दारू वाहतुकीसाठी ”नो पास”

लक्कडकोट चेक पोष्ट वर खुली सूट

राजुरा, अमोल राऊत (१६ मे) : लॉकडाऊन काळात संधीचे सोने करत तस्करांकडून दारूचा अवैध व्यवसाय चांगलाच फोफावल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. मात्र या प्रकारावर पडदा टाकण्याचे काम पोलीस प्रशासनाकडूनच होत असल्याची चर्चा सर्वसामान्यांत रंगली आहे. या काळात परराज्यात जाण्यासाठी ई-पास महत्वाची भूमिका निभावत असताना अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त दारूच्या अवैध वाहतुकीला ‘नो-पास’ असेच चित्र निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासनाचा अनागोंदी कारभार दिसून येत आहे.
राजुरा तालुक्यातील तेलंगणात जाणाऱ्या लक्कडकोट मार्गावर चेक पोस्ट आहे. याठिकाणी लॉकडाऊन काळात ये-जा करणाऱ्या वाहनांची ई-पास चेकिंग करून वाहनांना सोडले जाते. मात्र या चेक पोस्ट वर दारू वाहनांची ई-पास चेकिंग केली जाते का? हा यक्ष प्रश्न जनतेला पडला आहे. सर्रासपणे तेलंगातील दारू अवैधरित्या तालुक्यात आणून विक्री केली जात असताना प्रशासन इतके गाफील कसे राहू शकते? प्रशासनातील काही भेदी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अशीर्वादानेच हा अवैध दारू तस्करीचा खेळ रंगला असून संधीचे सोने करून खिसे भरून घेण्यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी धन्यता मानत असल्याचे चित्र दिसून येते. यावर उच्चस्तरीय कारवाई होऊन हा दांभिकपणा मोडीस निघेल का याकडे तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here