युवा परिवर्तन कडून सोनापूर येथे शिवणकला प्रशिक्षण 

0
600

युवा परिवर्तन कडून सोनापूर येथे शिवणकला प्रशिक्षण

 

महिलांनी कौशल्य विकास करुन आर्थिक प्रगती साधावी(सरपंच गोपीका टेकाम) 

 

 ✍️सुखसागर झाडे गडचिरोली :-

 

 चामोर्शी तालुक्यातील मोजा सोनापूर येथे खेरवाडी सोशिअयल वेलफेअर असोशिएशन अभियान अंतर्गत मागील 3 वर्षापासून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने स्वच्छता,सामाजिक परिवर्तन, गांडुळ खत निर्मिती वराह पालन प्रशिक्षण, शिवनकला प्रशिक्षण, वृक्ष लागवड, कोवीड -19 अवरनेस, उत्पन्न वाढव म्हणून पर्यावरण मित्र यांना प्रशिक्षण , फांउडेशनच्या मार्फत गरीबातील गरीब कुडुंबाना राशन वाटप तसेच कामगार लोकांना मिस्त्री प्रशिक्षण देऊन त्यांना एक रोजगार निर्माण करून देणे.इत्यादी विषयात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी कार्य करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार करिता चामोर्शी तालुक्यातील ग्राम पंचायत सोनापूर मार्फत येथील महिलांना खेरवाडी सोशल वेलफेअर असोशिएशन अभियानाच्या पुढाकाराने 25 महिलांना शिवणकाम प्रशिक्षण देऊन, 30 दिवस प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना स्किल इंडिया, राष्ट्रीय कौशल्य विकास योजना चे डिप्लोमा वाटप करण्यात आले. व पुढील टप्प्यात 50 महिलांचे उद्दिष्टे ठेऊन प्रशिक्षण देणे सुरु आहे.महिलांनी कौशल्य विकसित करून, स्वयंरोजगाराची कास धरावी, आणि आपलं आर्थिक विकास साधावा असे गोपिका टेकाम सरपंच यांनी सांगितले. याप्रसंगी शेषराव कोहळे उपसरपंच, अनिल उंदिरवाडे सदस्य, सविता कुंनघाडकर सदस्या, उषा चलाख सदस्या, कल्पना सिडाम सदस्या, तालुका समन्वयक कैलास बंकावार व तालुका समन्वयक नितेश शेंडे, विनोद आकुलवार, मुखरू लोंनबले, राजेंद्र पिपरे, रोशन मोगरकर उपस्थित होते. खेरवाडी सोशिअयल वेलफेअर असोशिएशन अभियान अंतर्गत सुरू केलेल्या या उपक्रमाचे गावकरी व प्रशिक्षित महिलांनी प्रशंसा केली व आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here