गडचांदूरातील त्या डॉक्टर, टेक्निशियन नसलेल्या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करा

0
559

गडचांदूरातील त्या डॉक्टर, टेक्निशियन नसलेल्या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करा.
कोरपना ता.ग्रा.पत्रकार संघाची निवेदनातून मागणी.
कोरपना प्रतिनीधी .प्रवीण मेश्राम
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात पोस्ट ऑफिस जवळ विराजमान चंद्रपूर येथील डॉ.ओमप्रकाश बोबडे यांच्या “श्री मॉयक्रोबॉयलॉजी & पॅथॉलॉजी लॅब”(एसएमपीएल) मध्ये मोठ्याप्रमाणात अनागोंदी व बेजबाबदारपणे कारभार सुरू असून याठिकाणी अनुभवी डॉक्टर,टेक्निशियन उपस्थित राहत नसून बिना अनुभवी मुलामुलींना नियुक्त करण्यात आले आहे.रुग्णांच्या रक्ताचे नमुने आनलाईन चंद्रपूर येथे पाठवले जातात आणि रिपोर्ट दिली जाते.वास्तविक पाहता अशा ठिकाणी अनुभवी डॉक्टर,टेक्निशियन उपस्थित राहणे आवश्यक आहे मात्र निव्वळ पैसा कमवण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे.सदर लॅब मधून चुकीची रिपोर्ट दिल्याच्या घटना घडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे प्रकरणात वाढ होताना दिसून येते आहे.”रुग्ण गडचांदूरात आणि डॉक्टर बसले चंद्रपूरात” अशी परिस्थिती असून या लॅबची निष्पक्ष चौकशी करून याला बंद करावे अशी मागणी कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे जिल्हा शल्यचिकीत्सक चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यांच्या बेजबाबदारपणाचे उदाहरण म्हणजे गडचांदूर येथील प्रतिष्ठित नागरिक,समाजसेवक उद्धव पुरी यांच्या मुलाचा ताप कमीजास्त होत असल्याने हे डेंग्यू,मलेरियाचे लक्षण तर नाही ना ! या शंकेचे निराकरण करण्यासाठी २ आगस्ट रोजी यांनी येथील डॉ.ओमप्रकाश बोबडे यांच्या “एसएमपीएल” या लॅब मध्ये मुलाच्या रक्ताची तपासणी केली असता चुकीचा रिपोर्ट देण्यात आला.प्लेटलेट्स काउंट चक्क ४९०००, हिमोग्लोबिन ४.२ असे दाखवल्याने घाबरून लगेच यांनी मुलाला चंद्रपूर येथे एका डॉक्टरकडे नेले आणि तपासणी केली तर रिपोर्ट पाहून अचंबीत झाले व त्या रिपोर्टबद्दल शंका व्यक्त केली.पुन्हा डबल रक्त तपासायला लावले तर प्लेटलेस्ट १८८००० व हिमोग्लोबीन १४.२ आढळून आले.यांच्या चुकीमुळे विनाकारण पूरी यांना आर्थिक,मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला.
असे प्रकरण समोर येत असून एक्सटेंशन काउंटर चालवायचे असेल तर याठिकाणी डॉक्टरांनी स्वतः उपस्थित राहवे अन्यथा लॅब बंद करावी.यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.सदर लॅब मधून जास्त कमिशन मिळत असल्याने येथील काही महाभागी डॉक्टर स्वतः रुग्णांना या लॅब मध्ये पाठवत असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून रुग्णांच्या आरोग्याशी हा जीवघेणा खेळ तसेच पैसा कमवण्यासाठी थाटलेले हे एक दुकान असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.करीता सदर लॅबची निष्पक्ष चौकशी करून याला बंद करावे अशी मागणी कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सै.मूम्ताज़ अली,उपाध्यक्ष गणेश लोंढे,उपाध्यक्ष मयुर एकरे,सहसचिव प्रवीण मेश्राम,सदस्य सतीश बिडकर इतरांनी राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,कोरपना तालुका वैद्यकीय अधिकारी(शहरी व ग्रामीण) तसेच कोरपना तालुका जनरल मेडिकल प्रॉक्टिशनर असोसिएशन यांना निवेदनातून केली आहे.आता जिल्हा शल्यचिकीत्सक व संबंधित याला किती गांभीर्याने घेतात याकडे लक्ष लागले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here