स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून मंजूर १ कोटी ४३ लक्ष रुपयांच्या पाणीपूरवठ्याची कामे तात्काळ सुरु करा – आ. किशोर जोरगेवार

0
486

आमदार स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून मंजूर १ कोटी ४३ लक्ष रुपयांच्या पाणीपूरवठ्याची कामे तात्काळ सुरु करा – आ. किशोर जोरगेवार

 

मनपाला जागविण्यासाठी भजन आंदोलन, यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन

 

चंद्रपूर/प्रतिनिधी : शहरातील पाणी समस्या सुटावी या करीता उपाययोजना करण्यासाठी आमदार निधी व खनीज विकास निधीतून 1 कोटी 43 लक्ष रुपयांचा निधी महानगर पालिका प्रशासनाला दिला. या कामाची निवीदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता नियमानुसार हि मंजूर कामे तात्काळ सुरु होणे आवश्यक असतांना सुध्दा केवळ महानगरपालिका पदाधिकार्यांकडून हेतुपरस्पर या कामांना विलंब करण्यात येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला असून मनपा जाग व सदबुध्दि यावी याकरीता हे आंदोलन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. तसेच हे कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आमदार स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून मंजूर 1 कोटी ४३ लक्ष रुपयांच्या पाणीपूरवठ्याची कामे तात्काळ सुरु करण्यात यावी या करीता आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महानगर पालिकेत भजन आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, विश्वजीत शाहा, विलास वनकर, राशिद हुसेन, विलास सोमलवार, सलिम शेख, मुन्ना जोगी, अजय दुर्गे, विनोद अनंतवार, आनंद रणशूर, आंनद इंगळे, बबलू मेश्राम, दिनेश इंगळे, राम जंगम, नितिन शाहा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सायली येरणे, भाग्येश्री हांडे, दुर्गा वैरागडे, कल्पना शिंदे, सविता दंडारे, विमल काटकर, वैशाली मेश्राम, कौसर खान, माधूरी काळे, रुपा परसराम, आशा देशमूख, वैशाली रामटेके, प्रमीला बावने, अस्मिता डोनारकर, अल्का मेश्राम, अनिता झाडे, वैशाली मद्दीवार, माधूरी निवलकर, माला पेंदाम आदिंची उपस्थिती होती.

दर उन्हाळ्यात मनपा हद्दीत पाण्याची भिषण टंचाई निर्माण होत असते. यावर उपयोजना करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून मनपा प्रशासनाला एक करोड 43 लक्ष रुपयांचा भरमसाठी निधी दिला हा निधी मनपाकडे सूपूर्दही करण्यात आला. या निधीतून शहरात हातपंप, ट्युबवेल व पाण्याच्या छोट्या टाक्या तयार करण्याचे कामे प्रस्तावीत करण्यात आले. यातून पाणी पूरवठा होत नसलेल्या भागात पाण्याची सोय करुन देणे शक्य झाले असते. याबाबत कंत्राटही काढण्यात आला. मात्र केवळ राजकारण करत हेतूपरस्पर या कामाचे वर्क आॅडर मनपा प्रशासनाकडून थांबविण्यात आले. परिणामी निधी उपलब्ध असूनही हे काम थांबले आहे. या विरोधातच आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा इमारतीत भजन आंदोलन करत गाढ झोपेचे नाटक करत असलेल्या मनपा प्रशासनाला जागवीण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह भजन मंडळींनी भजनाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला पाण्याचे महत्व पठवून दिले. दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यंदा पावसाळ्यातही कायम आहे. इरई धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतांनाही शहरात पाणी टंचाई का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. शहरातील अनेक भागात दोन ते तिन दिवसाआळ नळाचे पाणी सोडल्या जात आहे. हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे. असेही यावेळी आंदोलकांकडून म्हणण्यात आले. तर यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर चांगलाच संताप व्यक्त केला. चंद्रपूरकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे याकरिता आपण प्रयत्न करत आहोत याच करिता आपण पाणी पूरवठा होत नसलेल्या भागातही मुबलक पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने मनपा प्रशासनाला एक कोटी 43 लक्ष रुपयांचा मोठा निधी योग्य उपायोजना करण्यासाठी दिला होता. मात्र केवळ राजकारण करत हे कामे प्रलंबीत ठेवण्यात आले. महानगरपालिका पदाधिकार्यांनी सदर मंजूर कामांना मागील स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देणे अनिवार्य होते मात्र तसे झाले नाही. लोकहितोपयोगी कामांना स्थगिती देणे हे न्यायोचित नाही. नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे आवश्यक आहे. राजकीय द्वेषापोटी महानगरपालिका पदाधिकार्यांनी सदर काम सुरु करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला आहे. सदर कामांची प्रक्रिया पूर्ण होऊ न दिल्यामुळे नागारीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी मनपा आयूक्त राजेश मोहिते यांनी भजन आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी येत निवेदन स्विकारले. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here