जिव मुठीत घेऊन प्रवास करतोय बळीराजा

0
577

जिव मुठीत घेऊन प्रवास करतोय बळीराजा

 

कोरपना प्रतिनिधी/प्रवीण मेश्राम

कोरपणा तालुक्यातील अंतरगाव बु येथील शेतकरी जिव मुठीत घेऊन शेतात जाण्या येण्या साठी प्रवास करतोय .प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 लक्ष रुपए खर्च करून अंतरगाव ते स्मशान भूमी पर्यंत कच्च्या रस्ता (खळीकरण )करण्यात आला.याच रस्त्यात एक मोठा नाला आहे व त्या नाल्यावर कच्च्या पुल तयार करून रस्ता ये जा साठी सुरू झाला.हा रस्ता शेतकऱ्यांचा बैल बंडी शेतात घेऊन जाण्याचा मुख्य रस्ता आहे.

पण पहिल्याच पावसात 20 लाख रुपए खर्च करून बनवलेल्या रस्त्यातील पुल वाहून गेला आहे.

पुल वाहून एक महिना जास्त होऊन देखील या रस्त्यावर तात्पुरता पुल देखील बनवला गेला नाही.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यास दुसरा रस्ता नसल्यामुळे शेतकरी आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे.जर या आठवड्यामध्ये पुलाचे काम पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयावर धडक मोर्चा शेतकऱ्यांना घेऊन युथ एमर्जसी सर्विस अंतरगाव बु ने काढण्यात येणार आहे अशी माहीीती स्थानिक गावकऱ्यांनी दिली आहे.

शासन व लोकप्रतिनिधी या प्रकाराकडे लक्ष देईल का या कडे सर्व अंतरगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here