अन् त्यांनी चक्क नावेने जाऊन केले वीजपुरवठ्याचे काम!

0
390

अन् त्यांनी चक्क नावेने जाऊन केले वीजपुरवठ्याचे काम!

 

 

विरूर स्टे : मागील आठवडाभरापासून संततधार पावसामुळे वर्धा नदी दुथडी वाहत आहे. अशातच गावोगावचा वीजपुरवठा खंडित झाला. पूर असतानाही पुराच्या पाण्यात नावेतून कनिष्ठ अभियंता रोहित मकासरे व चमूने घटनास्थळी पोहोचून वीज खांबावरील विद्युत दुरुस्तीचे काम केले. राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशनपासून नऊ किमीवर येणाऱ्या धानोरा व कवीठपेट येथील वीजपुरवठा गुरुवारी सकाळपासून खंडित होता. तेथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली होती. गावातील उपसरपंच घनश्याम दोरखंडे यांच्यासह काही तरुणांनी कनिष्ठ अभियंता रोहित मकासरे यांना कळविले. वीज कर्मचारी गीता मानगुळधे, लाईनमन पुरोहित भिमटे यांना घेऊन आपल्या जिवाची पर्वा न करता दुरुस्ती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here