खडकी येथे तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंगाचे आंदोलन.

0
722

खडकी येथे तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंगाचे आंदोलन.

 

प्रतिबंधित तणनाशक रोधक कपाशीची केली लागवड

 

यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी,✍🏻संजय कारवटकर :- भारत सरकारची मान्यता नसलेल्या तणनाशक रोधक (एचटी बिटी) कपाशीच्या बियाण्याची जाहीर लागवड करुन सविनय कायदेभंग करण्याचे आंदोलन यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खडकी येथ राजेंद्र झोटींग यांच्या शेतात केले.

भारत सरकारच्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कपाशीच्या बोलगार्ड १ व बोलगार्ड२ या जातीना शासनाची मान्यता आहे. तणनाशक रोधक कपाशीच्या जातीस अद्याप जि.ई.ए.सी ने मान्यता दिलेली नाही. तणनाशक रोधक बियाणे वापरल्यास खुरपणीचा खर्च वाचणार आहे. सध्य मजूर खुप महाग झाले आहे व वेळेवर मजुर मिळत नाही. कपाशीचा हा वाण पेरला तर खर्च वाचतो व पीकही चांगले येते. हे तंत्रज्ञान आम्हाला उपयुक्त आहे तर त्याला बंदी घालणारे सरकार कोण असा सवाल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग यांनी केला.

कायदा मोडला म्हणुन कारवाई झालीच तर शिक्षा भोगू पण चोरुन बियाणे लावणार नाही. सरकारने शेतकर्याच्या हिताचा विचार करुन ‍ही अन्यायकारक बंदी उठवावी अशी अपेक्षा राजेंद्र झोटींग यांनी व्यक्त केली.

शेतकरी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष ललीत बहाळे यांच्या नेतृत्वात दि.10 जून पासून अकोला जिल्हात तंत्रज्ञान स्वातंत्र आंदोलन सप्ताह सूरू केला असून यवतमाळ जिल्हात प्रत्यक तालुक्यात तंत्रज्ञान स्वातंत्र आंदोलन होत आहे

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट 16 जून रोजी पूढील तंत्रज्ञान स्वातंत्र आंदोलनाची घोषणा करतील.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन , गोपाल भोयर, अमोल जवादे , गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे,सूरेश झोटींग भास्कर पाटील,ऊत्तम झोटींग, गजानन व अनेक शेतकरी व शेतकरी महिलांनी या आंदोलनात भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here