विद्यानगरी येथे रस्त्यावर रेतीचे ढिगारे, नागरिकांनी जायचे कसे?

0
488

विद्यानगरी येथे रस्त्यावर रेतीचे ढिगारे, नागरिकांनी जायचे कसे?

वणी : शहरालगत वसलेल्या, नांदेपेरा रोड नजिक ,विद्यानगरी शिक्षक वसाहत मागील वीस वर्षापासुन वास्तव्यास आहे. त्यामुळे या वसाहतीत मध्ये वयोवृद्धासह ,जेष्ठ नागरिक व छोटी मुले राहतात.. या बालकांना व जेष्ठ नागरिकांना, मुख्य मार्गाला जोडण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने मागील सहा महिन्यापूर्वी, नगरअध्यक्ष तारेंद बोर्डे यांच्या पुढाकाराने मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता पुर्ण करण्यात आला. त्यामुळे विद्यानगरी येथील नागरिकांचा ये-जा करण्याच मार्ग सुखकर झाला. तसेच विद्यानगरी येथील नागरिकांना दळण-वळणासाठी जोडणारा हाच एक आंतरीक रस्ता असल्याने कुठलीही अत्यावश्यक सेवा याच मार्गांनी करावी लागते.
मात्र विद्यानगरी मधील ये-जा करणाऱ्या मुख्य दळण-वळणाच्या रस्त्यावर काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात, रेतीचा ढिगारा टाकलेला आहे. हा ढिगारा इतका मोठा आहे की, रस्त्याच्या कडेवरून सुध्दा दुचाकी निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या वेळी मार्गक्रमण करायचे कुठुन.? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही वर्षांपूर्वी घरा पासून काही किलोमिटरच्या अंतरावर दुचाकी ठेवण्याची पाळी विद्यानगरी येथील नागरिकांना आली होती तशीच वेळ पुन्हा येते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे .
अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडल्यास जवाबदार कोण..? त्यामुळे या ढिगाऱ्यांची विल्हेवाट लवकरात लवकर लावण्यात यावी असे विद्यानगरी मधील नागरिकांनकडुन बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here