शिवसृष्टी प्रकल्प शिवजन्मभूमी सोडुन अन्यत्र हलविण्याचा अन्याय सहन करणार नाही – हाजी इर्शादभाई

0
415

शिवसृष्टी प्रकल्प शिवजन्मभूमी सोडुन अन्यत्र हलविण्याचा अन्याय सहन करणार नाही – हाजी इर्शादभाई

झाकीर हुसैन

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या निधीतून निर्माण होणारा ऐतेहासिक शिवसृष्टी प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमीतच व्हावा” अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व मुस्लिम मावळा हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.
” रयतेचे राज्य निर्माण करण्याचे धडे ज्या शिवजन्मभुमीतून छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आले, ज्या भूमीतून राज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, ज्या शिवजन्म भूमीतून महाराष्ट्र राज्याचा प्रारंभ झाला, शिवजयंती निमित्त राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ राज्यांसमोर नतमस्तक होण्यासाठी ज्या शिवनेरी गडावर हजर होतात त्याच ऐतेहासिक भूमीत शिवसृष्टी प्रकल्प उभा राहिला पाहिजे. शिवजन्मभूमी व शिवसृष्टी यांचे नैसर्गिक नाते असून तो प्रकल्प अन्यत्र हलविने अन्यायकारक ठरेल. शिवसृष्टी प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या स्वाभिमान व अभिमानाचा प्रकल्प आहे. तालुक्यावर कायम अन्याय केला जातो तो मंत्रीपदाचा प्रश्न असो की औद्योगीक वसाहतीचा परंतू तालुक्यातील सर्व पक्षीय लोक प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी या शिवसृष्टी प्रकल्पासाठी एकत्रितपणे येवून अन्याया विरुद्ध आवाज उठवावा”असे आवाहन हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here