घुग्घुस शहरात काँग्रेसतर्फे भव्य नागरी सत्कार व प्रवेश मेळावा संपन्न

0
264

घुग्घुस शहरात काँग्रेसतर्फे भव्य नागरी सत्कार व प्रवेश मेळावा संपन्न


घुग्घूस : राज्याचे नवनियुक्त विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांचा नागरी सत्कार सोहळा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी शहरात ढोल ताश्याच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. व बरेच जागी आतिषबाजी करून जल्लोषात विरोधीपक्ष नेत्याचे स्वागत करण्यात आले. स्व. प्रमोद महाजन मंच घुग्घुस येथे नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

याप्रसंगी प्रा. हेमंत उरकुडे यांनी बरेच नागरिकासह वड्डेटीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. उरकुडे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवाशाने पक्षाला बरेच खिंडार पडले असून तसेच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली तर काँग्रेस मध्ये नवचैतन्य संचारले आहे.

दिप प्रज्वलन व थोर पुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

काँग्रेस किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे भाषणात म्हटले की, मा. विजयभाऊ वड्डेटीवार ज्याच्या, ज्याच्या डोक्यावर हात ठेवले ते सभापती, जिल्हापरिषद व पंचायत समितीला बसले आहे, हे वरदान आमच्या क्षेत्रात भाऊनी दिले आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, वड्डेटीवाराने भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडीचा धाक दाखवता मात्र मी तुमच्या ईडी – चिडीला घाबरणारा नाही, मी जेलात जाईल पण भाजपात जाणार नाही. उपस्थित जनसमुदाया समोर भीष्म प्रतिज्ञा केली.

शिवसेना राष्ट्रवादीचे व अन्य पक्षाचे नेते भितीपोटी भाजपा सोबत गेले. मात्र काँग्रेस पक्ष हा या डबल इंजिन सरकारच्या जनविरोधी निर्णया विरोधी ठाम उभा आहे. व भविष्यात ही सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासन ही नागरिकांना दिले.

युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वड्डेटीवार यांनी शासकीय नोकरीत कंत्राटीकरण व शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या धोरणाला घेऊन राज्य शासनाचा कडाडून निषेध केला.

याप्रसंगी मंचावर माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगळे, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रवीण पडवेकर, माजी जिल्हापरिषद सदस्य जंयता जोगी, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर तसेच माजी ग्रामपंचायत सरपंच घुग्घुसचे शोभाताई ठाकरे, जिल्हा सचिव उत्तम ठाकरे, रमजान अली, प्रदेश सचिव शिवाराव, युवक अध्यक्ष राजेश अडडूर, लक्ष्मण सादलावार, प्रवीण लांडगे, कामगार नेते, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, नारायण ठेंगणे, मुन्नाभाई लोहानी, बाबा कुरेशी, शामराव बोबडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, एस. सी. सेल महिला शहर अध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा महासचिव पुष्पा नक्षीने, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, जिल्हा सचिव मंगला बुरांडे, माजी शहर अध्यक्ष विजया बंडी, वढा सरपंच किशोर वरारकर, पांढरकवडा माजी सरपंच सुरज तोतडे, सुधाकर बांदूरकर, एस.सी. सेल अध्यक्ष विक्रम गोगला, एस.सी. सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, युवक महासचिव सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, शेखर तंगल्लापेल्ली, श्रीनू गुडला, अलिम शेख, मोसीम शेख, अल्पसंख्याक काँग्रेस नेते सुनील चिलका, गणेश उईके उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी शहर अध्यक्ष जावेद सिद्दीकी, एस.सी. सेल माजी अध्यक्ष पवन आगदारी यांनी केले. सूत्र संचालन साहिल सैय्यद तर आभार प्रदर्शन लखन हिकरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here