शोकसंदेश नागरिकांच्या प्रश्नांसाठी तळमळता दाखविणारे नेतृत्व कायमचे पडद्याआड – आ. किशोर जोरगेवार

0
235

शोकसंदेश
नागरिकांच्या प्रश्नांसाठी तळमळता दाखविणारे नेतृत्व कायमचे पडद्याआड – आ. किशोर जोरगेवार
दिलीप रामेडवार यांच्या निधनाची वार्ता मन हेलावणारी आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी माझ्या संपर्कात असायचे. यासाठी त्यांचा सतत पाठपूरावा असायचा आज त्यांच्या अशा निघून जाण्याने नागरिकांच्या प्रश्नांसाठी तळमळता दाखविणाऱ्या नेतृत्वास समाज मुकला असल्याची शोक संवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
दिलीप रामेडवार क्रीडा प्रेमी होती. कबड्डी असोशिएशच्या अध्यक्ष पदाचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. आम्ही श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे उत्तम सहकार्य आम्हाला लाभले. क्रिडा संदर्भात ते नेहमी चर्चा करायचे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चंद्रपूरच्या क्रिडा क्षेत्राचेही नुकसान झाले असल्याचे शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here