यूवा नेते संजय डाेंगरेंच्या नियूक्तीमुळे पसरली नेरी चिमूरात आनंदाची लहर!

0
280

यूवा नेते संजय डाेंगरेंच्या नियूक्तीमुळे पसरली नेरी चिमूरात आनंदाची लहर!

अनेकांनी केले त्यांचे नियुक्तीचे स्वागत!

नेरी (चिमूर) । किरण घाटे

सुरुवातीपासुनच सक्रिय राजकारणात असणारे इंदिरा काँग्रेसचे निष्ठावंत जेष्ठ नेते तथा नेरी येथील मुळ निवासी असणारे गुलाबराव डाेंगरे यांचे सुपुत्र संजय गुलाबराव डाेंगरे यांची नुकतीच चिमूर संजय गांधी निराधार याेजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
त्यांचे या नियुक्तीमुळे नेरी चिमुर या परिसरातील मित्र मंडळीत काल आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसुन आले. तदवतचं अनेक मित्र मंडळीने व त्यांचे चाहत्यांनी त्यांचेवर अक्षरशा अभिनंदनचा वर्षाव केला.चंद्रपूर गडचिराेली या जुळ्या जिल्ह्याचे इंदिरा काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे शिफारसी नुसार नेरीचे सुपरिचीत यूवा नेते संजय डाेंगरे यांना ही संधी लाभली असल्याचे खुद्द डाेंगरे यांनी सांगितले .संजय डाेंगरे यांचे कुंटुबाची नेरी स्थित एक शैक्षणिक संस्था असुन त्यांचे अनेक सामाजिक संस्था तथा शैक्षणिक संस्थेशी निकटचे संबंध जुळले आहे .कांग्रेसच्या अनेक छाेट्या माेठ्या कार्यक्रमात ते जातीने उपस्थित राहतात .युवा मंडळीत अतिशय ते लोकप्रिय असुन आज नेरी विभागातील युवा पिढीचे ते प्रेरणास्थान आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here