दीपावली पूर्व काळात संगमनेर बाजारपेठेत अद्याप ही सूनसूनाट

0
392

दीपावली पूर्व काळात संगमनेर बाजारपेठेत अद्याप ही सूनसूनाट

 

अहमदनगर
संगमनेर २९/१०/२०२१ (प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेली बाजार पेठ संगमनेर बाजारपेठ असून, दिपावली पूर्व काळात बाजार पेठेत सन्नाटा असून ,दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. साखर कारखाना यांनी साखर वाटप जाहीर केले असले तरीही शेतकरी फक्त साखर घेऊनच घरी जातात, किराणा दुकानदार यांना त्यांची प्रतीक्षा आहे. कापड दुकानदार ही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असून प्रतेक वस्तू ची सुमारे २५%भाववाढ झाली आहे. डिझेल व पेट्रोल दरवाढीने सर्व सामान्य यांचे कंबरडे मोडले असून, वाहतूक खर्च दुप्पट झाल्याने सर्वच प्रकारचा माल केवळ वाहतुकीचा खर्च वाढल्याने भावात वाढ झाली आहे. शेतकरी या वर्षी निसर्गाने पूर्ण चिरडला असून, सोयाबीन ची कोलमडलेला भाव , अवकाळी पावसाने उध्वस्त झालेली भाजीपाला शेती , मजुरीचे वाढते दर, शेती खत, औषधे यांच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या किंमती या मुळे शेतीचे बजेट पूर्ण कोलमडले आहे. निसर्गाची अवकृपा हा दुष्काळात तेरावा महिना असचे म्हणावं लागेल. राज्य सरकार शेतकरी यांना मदत करत असून , केंद्र सरकार निष्क्रिय असल्याचे शेतकरी बोलताना दिसत आहेत.याचा परिणाम संगमनेर बाजार पेठेत दिसून येत असून, कोरोना मुळे व्यापारी वर्ग आगोदरच हतबल झाला असून, आता ग्राहक नसल्याने व्यापारी वर्गात धासती निर्माण झाली आहे. कामगार वर्ग ही महागाईने त्रस्त झाला असल्याने त्यांनी ही खरेदी कडे पाठ फिरवली आहे. शहरी व खेड्यातील गृहिणीचे बजेट कोलमडले असून ,”नको ती दिवाळी” .सुखाची भाकरी बरी असे चित्र दिसत आहे. या वर्षी ही सरकारने प्रदुर्षण करणारी शोभेच्या दारूवर बंधने टाकली आहेत. हातगाडीवर पणती विकणारे एका महिलेने सांगितले की दिवसभरात वीस रुपये धंदा झाला असून , चायना पणत्या लोक जपून ठेवतात व त्याची पुन्हा खरेदी करत नाहीत. मोजकेच हॉटेल वगळता अन्य हॉटेल मध्ये धंदे थंड असून, याचे कारण केवळ बिघडलेली अर्थ व्यवस्था आहे. दूध संघाचा मिळणारा बोनस, कारखाना थकबाकी यावरच बाजार पेठेचे भवितव्य अवलंबून असून, पेट्रोल डिझेल वाढ ने प्रतेक कुटुंबाचं आर्थिक विकास थांबवला असून, वाढती रोजगार मधील घट ही बाजारपेठ ओस पडण्याचे कारण आहे. दरम्यान पुन्हा पावसाचे संकट उभे राहणार असल्याने शेतकरी, कामगार जबाबदार पणे वागत असून, दिवाळीत ही असेच चित्र दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here