पठाणपूरा परिसरात चार अवैध रेतीची वाहने जप्त, महसुल पथकाची यशस्वी कामगिरी

0
540

पठाणपूरा परिसरात चार अवैध रेतीची वाहने जप्त, महसुल पथकाची यशस्वी कामगिरी

चंद्रपूर, किरण घाटे : चंद्रपूर समिपच्या पठाणपूरा भागातील जमनजट्टी परिसरात दिवसाढवळ्या विना परवाना रेतीची तस्करी करणा-या शहरातील चार माहिर रेती तस्करांच्या वाहनांवर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांनी व त्यांचे महसुल पथकाने कारवाया केल्यामुळे रेती माफियांत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत असे कळते की, साेमवार दि. १७ मे ला शहरा नजीक असलेल्या पठाणपुरा परिसरातील भागात अंदाजे दुपारी २ ते ३वाजताच्या दरम्यान भर रखरखत्या उन्हात रेती तस्कर आपल्या वाहनांनी अवैधरित्या सकाळ पासून रेतीची वाहतुक करीत हाेते. याची गुप्त माहिती येथील उपविभागीय कार्यालयाचे एसडीआे राेहन घुगे यांना मिळाली. त्यांनी लगेच कुठल्याही क्षणाचा विलंब न करता या भागातील महसुल पथकाला साेबत घेवून दाैरा केला. दरम्यान त्यांना या दाै-यात चार अवैध रेतीची वाहने आढळुन आली. त्या वेळी ट्रॅक्टर चालकांकडे रेती परवान्याची त्यांनी चाैकशी केली असता त्यांचे कडे कुठलीही परवानगी दिसून आली नाही. नंतर तात्काळ महसुल पथकाने जप्तीनामे करुन ती वाहने दंडात्मक कारवायांसाठी चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा केली. या चार वाहनात प्रामुख्याने ३ ट्रॅक्टर व एका हाँप बाँडी ट्रकचा समावेश आहे. जप्तीतील ही वाहने शहरातील माहिर रेती तस्करांची असल्याचे सर्वत्र बाेलल्या जाते. या आधी चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस परिसरात एका रेती घाटावर आपला जिव धाेक्यात टाकून तब्बल २६ अवैध रेती वाहने पहाटेला एकाच दिवशी दुचाकी वाहनाने दाैरा करुन एसडीआे राेहन घुगे यांनी पकडली हाेती. वाहन मालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाया केल्याचे सर्वश्रुतच आहे. पठाणपुरा भागातील रेती तस्करांवर कारवाया करतांना महसुल पथकात येथील नायब तहसीलदार सचिन खंडारे, पटवारी प्रवीण वरभे, विशाल कुऱ्हेवार, संजय बनकर, राजू धासलवार, राहुल बनकर व रईस खान यांचा समावेश हाेता. या धडक कारवायांचे जनतेनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here