यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0
303

यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकर, बहुजन विभागाचे बबलु मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, जितेश कुळमेथे, राम जंगम, सायली येरणे, सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, माधुरी निवलकर, अस्मिता डोणारकर, माला पेंदाम, वंदना हजारे, चंद्रशेखर देशमुख, बादल हजारे, प्रवीण कुलटे, कैलास धामनगे आदींची उपस्थिती होती.

आज १४ एप्रिल निमित्त देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित आणि इतर वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. ते राजकारणी, वकील, मानववंशशास्त्रीय, शिक्षक आणि अर्थशास्त्रज्ञ होते. सामाजिक कार्य करण्यासोबतच त्यांनी जनतेला शिक्षणाचे मूल्यही पटवून दिले. त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि जातिव्यवस्थेचा अंत करण्यासाठी प्रेरित केले असे यावेळी ते म्हणाले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने खिर वाटप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने बाबूपेठ येथील जुनोना चौक येथे खिर वाटप करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, सायली येरणे, निलिमा वनकर, कविता निखारे, माधुरी निवलकर, शारदा मरस्कोल्हे, सिंधू सरकटे, जानवी वनकर आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here