तोहोगाव मार्ग ठरतो आहे जिवघेणा

0
620

तोहोगाव मार्ग ठरतो आहे जिवघेणा

गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

 

बल्लारपूर, राज जुनघरे : गोंडपिपरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोठारी, तोहोगाव मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिवघेणा ठरत आहे. मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले असून बांधकाम विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत कां ? असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.

 

कोठारी, तोहोगांव, लाठी मार्ग हा नेहमीच नागरिकांसाठी त्रास दायक ठरलेला आहे. प्रवासी वाहनांसह प्रवाशांना वेदनादायी असुन सततच्या पावसामुळे मार्ग उखळत चालला आहे. यामुळे पावसाचे पाणी साचुन मोठमोठे खड्डे पडले आहेत. बामणी,कडेसावली दरम्यान पुला नजीक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचुन राहत असल्याने कित्येक अपघात झाले आहेत. अपघातात जिवहानी झाली आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. त्याचसोबत परसोडी, पाचगाव दरम्यान नव्याने बांधकाम होत असलेला पुल या भागातील प्रवाशी नागरिकांसाठी डोके दुखीच ठरत असून कंत्राटदारांच्या व बांधकाम विभागाच्या विभागाच्या अभियंत्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे दैनंदिन वाहणे फसण्याचा प्रकार घडत आहे. अशा दैयनिय मार्गामुळे व वाहनांना अडथळा निर्माण होत असल्या कारणाने परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद पडल्या असुन विद्यार्थी, पालक, शेतकरी व शासकीय कार्यालयीन कामांना विलंब होऊन अनेकांचे नुकसान होत आहे.

 

 

मागील दोन वर्षांपासून या मार्गाचे काम करण्यात आले. मात्र अभियंते व ठेकेदारांच्या दर्जाहीन आणि गुनवता नसलेल्या कामाचा परिणाम मार्ग उखडु लागलेला आहे. या क्षेत्राचे लोकप्रतिनिधींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी व गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here