घुग्घुस लाॅयड्स मेटल उद्योगात दिवाळी मिलन समारंभ

290

घुग्घुस लाॅयड्स मेटल उद्योगात दिवाळी मिलन समारंभ

 

दि.२२ ऑक्टोबर २०२२ शनिवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड तर्फे संलग्नीत भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघ घुग्घुस यांचे साठी दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश पाटीदार तसेच ऑपरेशन विभागाचे उपाध्यक्ष श्री. गुणाकर शर्मा, सहाय्यक उपाध्यक्ष श्री विनोद पांडे, सहाय्यक उपाध्यक्ष श्री.पवन मेश्राम तसेच भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे महामंत्री श्री. हिवराज बागडे यांच्यासह द्विपप्रजलीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एच आर विभागाचे उपाध्यक्ष श्री. पवन मेश्राम व संलग्नीत युनियनचे पदाधिकारी यांनी एकमेकाची परिचय दिले.

लाॅयड्स मेटल उद्योगाकडून २७ वर्षाचा अनुभवातून पहिल्यांदाच दिवाळी मिलन समारंभ आयोजित करण्यात आले, असे युनियनचे महामंत्री श्री.हिवराज बागडे यांनी आपल्या मनोगात व्यक्त केले. २७ वर्षात पहिल्यादा वेळवर कामगारांचे दिवाळी बोनस दिल्याबद्दल कामगार आणी त्यांच्या परिवारामध्ये उत्साह निर्माण झाले असे श्री प्रमोद येलचलवार, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मनोगनात व्यक्त केले.

भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाच्या पदाधिकार्यांना व्यवस्थापनातर्फे दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले

यावेळी उद्योगाचे वरीष्ठ कर्मचारीगण, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक तरुण केशवानी, रवि बेले भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

advt