राजुरातील विकास कामांसबंधी निमकर यांची केंद्रीयमंत्री गडकरी सोबत चर्चा

0
488

राजुरातील विकास कामांसबंधी निमकर यांची केंद्रीयमंत्री गडकरी सोबत चर्चा

 

 

राजुरा : शहरासह तालुक्यासाठी महत्वपूर्ण असलेला अत्यंत महत्वाचा बायपास रस्ता व शहरातील रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी काढण्यासाठी (दि.५) दिल्ली येथे माजी आमदार सुदृशन निमकर यांनी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितित केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राजुरा शहरातील व बायपासमार्गाच्या समस्येबाबत चर्चा करून समस्या निकाली काढण्याबाबतचे निवेदन दिले आहे.

राजुरा बामणी मार्गावरील वर्धा नदीवर पूल जीर्ण झाला असून या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम सस्पेंशन ब्रिज अशा आधुनिक पध्दतीने सुशोभीकरण, सौंदर्यीकरन व विद्युतीकरण करून उत्कृष्ठ पर्यटन स्थळ म्हणून विकसित करने, राजुरा येथे होणाऱ्या बायपास रस्त्यावरील पुरबुडीत क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूलाचे बांधकाम करने, राजुरा शहरातुन जाणाऱ्या मुख्यमार्गांचे द्विभाजकासह रुंदीकरण सुशोभीकरण सौंदर्यीकरण व विद्युतीकरण करणे, याच महामार्गावर गडचांदूर कडे जाणाऱ्या ग्राम पंचायत रामपूर हद्दीत पुलाचे बांधकाम मंजूर करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चेअंती नितीन गडकरी यांनी सदर कामांची आवश्यकता तातडीने तपासून कामाचा समावेश करण्याचे निर्देश संबंधितांना दिले व यासंबंधाने लवकर बैठक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. राजुरा शहरासाठी अत्यंत महत्वाची पण दुर्लक्षित अशी ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन माजी आमदार सुदर्शन निमकर यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here