कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा – आ. किशोर जोरगेवार

0
552

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक

 

अचाणक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हि चिंतेची बाब आहे. मात्र कोरोणाच्या दुस-या लाटेत उद्भवलेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये या करिता रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवून आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला केल्या आहे.

आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या अधिका-याची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अशोक नितनवरे, जिल्हा चल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, मायक्रो बायोलाॅजी प्रमूख डाॅ. राजेंद्र सुरपाम आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्हात कोरोनाच्या रुग्णसंख्येने प्रतिदिन वाढ होत आहे. असे असले तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र संभावित उद्भवणा-या संकटाशी सामना करण्यासाठी सतर्क आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असणे गरजेचे आहे. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. आज आयोजीत बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहेत.

चंद्रपूर मतदार संघातील शासकीय रुग्णालयात ६५० खाटांची व्यवस्था आहे. हि व्यवस्था वाढवून ८०० खाटांपर्यत पोहचवावी अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. तसेच घूग्घूस येथील राजिव रतन रुग्णालयात १०० खाटा वाढवणे सहज शक्य आहे. त्या दिशेनेही आरोग्य विभागाने काम करण्याच्या सुचना आ. जोरगेवार यांनी केल्या आहे. आरटीपीसीआर चाचणीचे काम उत्तम सुरु असल्याचे सांगत त्याचे कौतुकही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. मात्र वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता या चाचण्या आणखी वाढविण्याची गरजही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

रुग्णसंख्या आणखी वाढल्यास आॅक्सिजनची कमतरता भासू नये या दिशेने आता पासूनच उपाय – योजना करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्यात. आॅक्सिजन आणि व्हेटींलेटर युक्त बेडची संख्या जाणून घेत उपायोजना म्हणून या बेडच्या संख्येतही वाढ करण्याच्या सुचना त्यांच्या वतीने करण्यात आल्यात.

कोरोनाचा ओमिक्रॉन हा विषाणू अतिषय वेगाने नागरिकांना संक्रमीत करत आहे. अशात आवश्यकते नुसार डाॅक्टर आणि परिचारक – परिचारिकांची संख्या वाढविण्यात यावी, रुग्णालयात स्वच्छता ठेवण्यात यावी, रुग्णालय परिसरात सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात यावी, कोरोना रुग्णांशी वेळोवेळी संपर्क साधत त्यांना मार्गदर्शन करता यावे अशी व्यवस्था उभारण्यात यावी, रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती त्यांच्या नातलगांना देण्याची व्यवस्था करावी, रुग्णालयात जनजागृतीपर फलक लावण्यात यावे, कोरोना रुग्णांना सहज बेड उपलब्ध होईल याचे सुनियोजीत नियोजन करण्यात यावे, यासह अनेक महत्वाच्या सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. तसेच नागरिकांनीही सतर्क राहत कोरोनापासून बचावासाठी सामूहिक अंतर, माक्स आणि सॅनिटायजर या त्रिसुत्रीची पालण करावे असे आवाहण नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here