धाब्यात बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

0
475

धाब्यात बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

गोंडपिपरी (सुरज माडुरवार)

संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लोक लेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

 

सदर शिबिर दि.( 29) बुधवारला 11 ते 5 वाजेपर्यंत राहणार असून या शिबिरात डॉ के एस लांजेवार नेत्रचिकित्सा अधिकारी,डॉ एस बुराण ,डॉ एम एस पेंदाम,डॉ पवन गणुरे हे नेत्रचिकित्सक उपस्थित राहणार असून गोंडपिपरी तालुक्यातील व धाबा परिसरातील गरजू रुग्णांनी या मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संत परमहंस कोंडया महाराज संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार यांनी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here