मालती सेमले यांचा बाल काव्यसंग्रह, “बाग आम्हा मुलांची” चे चंद्रपुरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन !

0
682

मालती सेमले यांचा बाल काव्यसंग्रह, “बाग आम्हा मुलांची” चे चंद्रपुरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन !
🟫⬜🟥🟪चंद्रपूर🟪🟫🟪🟫किरण घाटे🟥🟪⬜

सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या, राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्या निमित्त आयोजित भव्य साहित्यिक मेळ्यात, सुपरिचित कवयित्री मालती सेमले ( सह शिक्षिका)जि.प.उच्च प्राथमिक शाळा मोखाळा यांच्या *बाग आम्हा मुलांची* या बाल काव्यसंग्रहाचे नुकतेच थाटात प्रकाशन करण्यात आले.
चंद्रपूरातील स्थानिक श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित या देखण्या पुरस्कार समारंभात गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.किर्तीवर्धन दिक्षित अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, डॉ.अशोक वासलवार, डॉ. श्याम मोहरकर, डॉ.पद्मरेखा धनकर, श्री सुदर्शन बारापात्रे उपस्थित होते. 🟥🟪⬜🟪🟥🟫🟪🟫या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते आपल्या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन होणे,ही गौरवाची आणि आनंदाची गोष्ट आहे,असे पुस्तकाच्या कवयित्री मालती सेमले म्हणाल्या. 🟥🟪⬜🟫🟫🟪🟥⬜🟫मराठी बाल साहित्यात , सेमले यांचा बाग आम्हा मुलांची हा बालकाव्यसंग्रह मोलाची भर घालेल, असे सुर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here