कॅन्सर ग्रस्त युग ला हान रट्टाक्रीडा मंडळाच्या वतीने भरीव मदत

0
459

कॅन्सर ग्रस्त युग ला हान रट्टाक्रीडा मंडळाच्या वतीने भरीव मदत

वणी (यवतमाळ), मनोज नवले

वणी तालुक्यातील शिंदोला या गावातील युग कैलास मालेकर याला कॅन्सर या आजाराने ग्रासलेले आहेत. तो आता मृत्युंशी झुंझं देत आहे. युगचे वडील हे भूमीहीन असून अतंत्य हालाखीची परिस्थिती आहे . त्यांना आलेल्या संकटावर मात करण्यासाठी,नागपूर या मोठया शहरांत मुलावर उपचार सुरु आहे. मात्र औषध आजारावर खर्च आणि प्रवास हा खर्च आवाक्या बाहेर असल्याने त्यांना माणुसकी या नात्याने सरळ हाताने मदत करणे फार गरजेचे आहे. याच सामाजिक जाणीवेतून एक हात मदतीचा पुढे करून जय हो हान रट्टा क्रीडा मंडळा कडून भरीव अशी युग चे वडील यांना आर्थिक मदत केली. सामाजिक भावनेतून मदत करण्याचे आवाहन वणीकर जनतेला केले आहे. यावेळी जय हो हान रट्टा क्रीडा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here