शहरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त साठी होणार आंदोलन

0
484

शहरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त साठी होणार आंदोलन

वणी (यवतमाळ), मनोज नवले 

शहरात मोठ्या प्रमाणात डुकरांची (वराहांची) उत्पत्ती वाढली आहे. वणी शहरात गल्लोगल्ली मोकाट डुकरे फिरत असून दुर्गंधी पसरवित आहे. त्यामुळे डेंगु, मलेरिया, टाइफाइड सारखे भयावह रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शहरामध्ये जंतुनाशक फवारणी होत नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या आरोग्याच्या कामांकडे वणी नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या आधी कोरोना महामारीने नागरीक त्रस्त होते.

 

 

आता डुकरांचा १५ दिवसामध्ये बंदोबस्त न केल्यास नगर परिषदेला घेराव करून आंदोलनात्मक भुमीका घ्यावी लागेल असा ईशारा कॉंग्रेस कमिटी तर्फे निवेदनाद्वारे दिला आहे.

 

 

 

यावेळी मुख्यधिकारी यांना निवेदन देतांना प्रमोद निकुरे, इजहार शेख, प्रमोद लोणारे, संतोष पारखी, निलेश परगंटीवार, अक्षय धावंजेवार, संतोष सिदमसेट्टीवार, कैलास पोन्नरवार, शाहूल आसमवार, विक्की परगंटीवार, राहुल मेदरवार, अक्षय गजलवार, साई अंदळवार ईत्यादींसह कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here