महा वसुली आघाडी सरकारचा जाहीर निषेध

0
478

महा वसुली आघाडी सरकारचा जाहीर निषेध

चामोर्शी – 21 मार्च रविवार येथील लक्ष्मी गेट चौक येथे आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने राज्यातील माहाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राच्या आधारे दर महिन्याला १०० कोटी रुपयांचा वसुली प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य आहे व हा प्रकार महाराष्ट्र राज्याचा सन्मान हणन करण्याचा प्रकार आहे व दिवसेंदिवस मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर होत असलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे व गृहमंत्री अनिल देशमुख सारख्या जबाबदार मंत्रीवर पोलीस आयुक्त यांनी आरोप करने म्हणजे लाजिरवाणा प्रकार आहे या सर्व प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा यासाठी निषेध व्यक्त करून भारतीय जनता पक्षाचे वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
आज या आंदोलनाने व महावीकास आघाडी सरकार विरोधात नारेबाजीने संपूर्ण शहर दुमदुमले यावेळी उपस्थितांना आमदार डॉ होळी यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रामुख्याने भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजप बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा , तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे ,विनोद गौरकर , विकास मैत्र, भाजपा युवा नेते प्रतीक राठी ,भोजराज भगत , पंचायत समितीच्या सदस्या चंद्रकला आत्राम ,पंचायत समिती सदस्य सुरेश कामेलवार ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार ,जयराम चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here