‘त्या’ दुचाकी मौका पंचनाम्याच्या चर्चेला शहरात उधाण

0
667

‘त्या’ दुचाकी मौका पंचनाम्याच्या चर्चेला शहरात उधाण

तपास पध्दती व मौका पंचनामा संशयाच्या भोवऱ्यात

 

राजुरा : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या लाक्षणीक घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसांगणीक दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. यावर अंकुश घालण्यासाठी प्रशासनकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे वारंवार प्रसिध्दी माध्यमांसमोर सांगितले जाते. मात्र राजुरा पोलीस स्टेशनमधील गुन्हे अन्वेषन शाखेच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह होत आहे. दोन दुचाकी वाहन खासगी वाहनाने झुडपात टाकून देण्यात आले. व काहीच वेळात काही पोलीस अंमलदारांनी तेथे येवून पंचनामा केला व वाहन जप्त केले. ज्या चाकी मालवाहतूक वाहनात हे दुचाकी वाहन आणण्यात आले होते. त्याच मालवाहतूक वाहनाने काहीच मिनिटात ते दुचाकी वाहन जप्त करून नेण्यात आल्याने गुन्हे अन्वेषण शाखेच्या मौका पंचनाम्याची शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

काल (दि. 22 नोव्हेंबर) रोजी सांयकाळी 5.30 च्या सुमारास पोलीस स्टेशन हद्दीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोरील वनविभाग नर्सरी रोडवर एका चारचाकी मालवाहु वाहनात दोन दुचाकी आणण्यात आल्या. त्या दुचाकी जंगली झुडपात टाकून तेथून काहीच अंतरावरील मुख्य मार्गावर मालवाहू वाहन उभे करण्यात आले. काहीच मिनिटांत पोलीस वाहनातून गुन्हे अन्वेषण विभागातील एका हवालदारासह अंमलदार व पंच पोहचले. क्षणाचाही विलंब न करता मौका पंचनामा सुरू करून दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. ज्या मालवाहू वाहनातून ही दुचाकी वाहने आणून टाकण्यात आली होती. त्याच मालवाहू वाहनातून ती दुचाकी वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात नेण्यात आली. हा प्रकार सांयकाळी फिरायला जाणाऱ्या अनेक वयोवृध्द व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसमोर घडल्याने तेथील काही नागरिकांनी पत्रकारांना घडलेला प्रकार सांगीतला. या प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा असून पोलीसांचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षकांना विचारणा केली असता, आम्ही गुन्ह्याची कार्यवाही पुर्ण करून वार्तापत्र देवू असे सांगण्यात आले. मात्र घडलेला प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुध्दा त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्षिपणाची भूमीका घेतली. यामुळे वाहन चोरीच्या या प्रकरणातील ही वाहने नेमके आले कुठून असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे. जर ते वाहने तेथेच आढळून आले होते तर त्या मालवाहू वाहनातून ते दुचाकी वाहन अन्य ठिकाणाहून का आणून तेथे टाकण्यात आले. असे अनेक प्रश्न पोलीसांच्या या कार्यावाहीत पुढे येत आहे.

गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचाऱ्यांची भूमीका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहली असून आता नागरिकांसमोरच बनावटत मौका तयार करून त्यांचे पंचेनामे केल्या जात आहे. या कार्यवाहीतील पंच व मालवाहू वाहन देखील अत्यंत निकटचे असल्याचे बोलल्या जात आहे. सदर गुन्ह्यात एका संशयीताला अपराध क्रमांक 431/21 नुसार गुन्हा नोंद करून कलम 379 भांदवी अंतर्गत अटक करण्यात आल्याचे कळते. यासर्व प्रकरणाची पोलीस अधिक्षकांमार्फत चौकशी करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here