तहसिल कार्यालयातील खुल्या जागेवरील अतिक्रमण प्रकरण

0
510

तहसिल कार्यालयातील खुल्या जागेवरील अतिक्रमण प्रकरण

दोन दिवसात अतिक्रमण हटवा अन्यथा तहसील कार्यालया समोर आंदोलन करू…

जिवती : अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या शेवटच्या ठेकावर बसलेल्या जिवती तालुक्यातील तहसील कार्यालयातील खुला जागेवर कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता काही बचत गटांची शासकीय जागेत अतिक्रमण करून टिनाचे शेड टाकून अतिक्रमण केले आहे.

या संदर्भात तत्कालीन तहसिलदार जिवती यांना जिवन राजाराम तोगरे यांनी दिनांक १४/०९/२०२१ ला माहितीचा अधिकार अधिनियम २०५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी (जोडपत्र अ) नुसार माहिती मागितली असता दिनांक २३/११/२०२१ तदकाळील तहसिलदार यांनी माहिती देण्यास पारदर्शकता राखुन विविध मुद्दतीच्या आत माहिती देऊन कर्तव्य बजावले आहे, तहसिलदार यांनी आणि माहितीच्या अर्जात स्पष्टपणे नमूद केले आहे की “तहसिल कार्यालयाचा अवारात उपहागृहाकरीता टिन टिनाचे शेड उभारणीच्या प्रकणाचा शोध घेतला असता कोणत्याही प्रकारची दस्तऐवज या कार्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे या कार्यालयाकडून सदर बांधकामाकरीता कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. असे स्पष्टपणे पणे आपल्या अर्जात नमूद केले आहे.”

पण तदकाळानील तहसिलदार जिवती ठेस निर्णय घेऊन टिनाचे शेड काढण्यासाठी निर्णय घेत नाही आहे, येत्या दोन दिवसात तहसील कार्यालयातील खुला जागेवरील टाकलेल टिनाचे शिड निघ्याले नाही तर तहसिल कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा शिवसेना महिला संघटिका सिंधुताई जाधव व प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here