वाचनायतील शौचालयात अस्वच्छता ; नगराध्यक्षांनी लक्ष देण्याची वाचकांची मागणी

0
362

वाचनायतील शौचालयात अस्वच्छता ; नगराध्यक्षांनी लक्ष देण्याची वाचकांची मागणी

 

राजुरा, २३ नोव्हें. : येथील व्यंकटेश वाचनालयात शहरातील वाचक, विद्यार्थी वाचनासाठी येतात. मात्र येथील स्वच्छता गृहात कमालीची अस्वच्छता असून याकडे संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत येथील वाचकांनी केली आहे.

राजुरा येथील व्यंकटेश वाचनालयात स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेकरिता वाचकांनी वारंवार स्थानिक नगरपरिषद येथील आरोग्य विभागाला कळविले. मात्र संबंधित विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. नगराध्यक्षांनी यात स्वतः लक्ष घालून या वाचनालयाचे नूतनीकरण केले. अस्वच्छतेमुळे वाचकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याकरिता वाचनालयाचे पावित्र्य राखण्यासाठी नगराध्यक्षांनी याकडेही जातीने लक्ष घालावे अशी मागणी वाचकांनी केली आहे.

तसेच संविधान चौकातील सिग्नल यंत्रणा परत का बंद झाली…? याकडेही अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून हि यंत्रणा पूर्ववत करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here