श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने व्रूशाली धर्मापुरीवार यांचा सत्कार

0
601

श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने व्रूशाली धर्मापुरीवार यांचा सत्कार

चंद्रपूर किरण घाटे – स्थानिक निर्माण नगर तुकुम येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ग्रामगीताचार्य पदवी मिळाल्याबद्दल व्रृशाली धर्मापुरीवार यांचा सत्कार दि. १० ऑगस्टला जेष्ठ नागरिक संघ भवन येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक तथा संघाचे सल्लागार जनार्दन पंधरे यांनी विभूषित केले हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून सुभाष कासंनगोटुवार व मंजुषा कासंनगोटुवार प्रामुख्याने उपस्थित होते.गुरुदेव सेवा मंडळाचे दादाजी नंदनवार,प्रज्ञा बोरगमवार. विजय चिताडे, पुरुषोत्तम राऊत. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बबनराव धर्मपुरीवार,वृंदा हुलके, प्रतिभा रोकडे, सुवर्णा लोखंडे, माधुरी बोडेकर ,अपर्णा चिडे , कामीनी वैरागडे असे अनेक संस्थांचे पदाधिकारी व सदस्य , जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य मंडळी या शिवाय निर्माण नगर परिसरातील असंख्य पुरुष तथा महिला उपस्थित होते .प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ग्रामगीताचार्य व्रूशाली धर्मापुरीवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यांत आला . सत्कार सोहळ्यात बाेलतांना सर्व अतिथीने आपल्या भाषणातुन व्रृशाली धर्मापुरीवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला. सत्काराला उत्तर देताना धर्मापुरीवार यांनी म्हटले की मी महराजाच्या कृपेने बरीच मेहनत व परिश्रम घेतले होते व सर्वांच्या आशीर्वादाने मला ही ग्राम गीताचार्य पदवी मिळाली.कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ योगशिक्षक व श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष रमेशजी ददगाल यांनी केले .तर आभार संघाचे सल्लागार सदस्य दिवाकर राऊतकर यांनी मानले .या कार्यक्रमाची सांगता अल्पाेहाराने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here