कोरोना योद्धा शाहिद डॉ. सुनील टेकाम यांना वाहिली संविधान चौक राजुरा येथे श्रद्धांजली

0
290

कोरोना योद्धा शाहिद डॉ. सुनील टेकाम यांना वाहिली संविधान चौक राजुरा येथे श्रद्धांजली

अमोल राऊत, 23 ऑगस्ट

कोरोना योद्धा डॉ. सुनील टेकाम यांचे 21 ऑगस्टला कोरोनाने निधन झाले. त्यांना आज संविधान चौक राजुरा येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. टेकाम वरोरा रुग्णालयात कार्यरत होते. कोरोना रुग्णांची सेवा करतांना त्यांना कोरोना साथीने ग्रासले. चंद्रपुरात कोविड केअर सेंटरला उपचार घेत असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या विरगतीच्या स्मरणार्थ आज त्यांना संध्याकाळी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्याची प्रार्थना उपस्थिताकडून करण्यात आली.
यावेळी जे.सी.आय. राजुरा रॉयल, नवंराष्ट्र पत्रकार सय्यद जाकीर, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत, राहुल अंबादे तसेच आसिफ सैय्यद मित्र मंडळ, सतीश धोटे, अँड. अरुण धोटे, अविनाश जाधव, बापूराव मडावी, संतोष देरकर, सचिन डोहे, सय्यद जाकीर, रेखा देशपांडे, जेसीआय अध्यक्षा सुषमा शुक्ला, मोहन कलेगुरवार, राहुल थोरात, सुधीर अरकिलवार, छबिलाल नाईक, अजयकुमार श्रीकोंडा, प्रणय भोगा, राहुल जगत, हरीश ब्राम्हणे, पोलिस कांस्टेबल प्रवीण डवरे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश रामटेके, स्वतंत्र कुमार शुक्ला, फारुख शेख, कपिल इद्दे, शहानवाज कुरेशी, बाबा कोडापे, संतोष उइके, अनिल आलाम, अमृत आत्राम, विजया बाबा कोडापे, सिद्धांत शुक्ला, त्रिशा शुक्ला, आसिफ सय्यद, अनंत डोंगे, नरेंद्र कुळमेथे, हिराजी वेलादी, शुभास मरस्कोल्हे, अंतरिक्ष बाबा कोडापे, रवी बुरडकर, विवेक झाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धा शहीद डॉ. सुनील टेकाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

impact24news team कडून भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here