स्वताच्या बळावर उभी हाेणारी चंद्रपूरची शेपाली !

0
647

स्वताच्या बळावर उभी हाेणारी चंद्रपूरची शेपाली !

चंद्रपूर -किरण घाटे – वि.प्र . नांव शेपाली ! ती महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंची मुख्य संयाेजिका सुविधा बांबाेडे यांची कन्या ! अभ्यासात निष्णांत असणारी शेपालीने इलेक्ट्रीक इंजीनियर पर्यंत शिक्षण केले. सध्या ती गुजरात येथे जाँब करते .तिचा एल अँड टी मध्ये जाँब सुरु आहे .परिस्थितीवर मात करीत तिने आपले शिक्षण पुर्ण केले .वेळ प्रसंगी शेपालीने (शिकत असतांना अल्पकालीन )खासगी जाँब देखिल स्विकारला! पण आलेल्या परिस्थितीत जिवनात ती कधी डगमगली नाही .महाविद्यालयीन जिवनात दाेनदा ती विद्यापीठ प्रतिनिधी राहिली आहे .आयुष्यात सर्वाधिक शिक्षणाला महत्व देणारी शेपाली नवाेदित तरुणींसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे .तिचे काैतुक करावे तेवढे कमीच आहे .वडिलांचे छायाछत्र हयात असतांना प्रेमाचा आेलावा न मिळणां-या जन्मदात्या आईने मात्र तिला भरभरुन प्रेम दिले .आपल्या उभ्या आयुष्यात ती आईच्या प्रेमाला कधीही विसरु शकणार नाही .शिक्षणा साेबतच तिला न्रूत्यकलेची व गायनाची आवड आहे .आवाजही तेवढाचं सुरेख व सुंदर , बाेलनेही तितकेच मधुर व गाेड ! महाविद्यालयीनच्या प्रत्येक परिक्षेत ९५टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारी शेपाली जरी गुजरातला राहत असली तरी तिला सणासुदीच्या दिवसात ब्लँक गोल्ड सिटी म्हणून आेळखल्या जाणां-या (स्वगावाची )चंद्रपूरची आवर्जुन आठवण हाेते .महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना मिळत असलेल्या स्काँलरशिप मध्ये पुस्तके खरेदी करुन शिक्षण पूर्ण करणारी शेपाली आज ही माेठ्यांचा मान सन्मान करते .नाेकरीत आल्यावर ही आपला बडेजाव पणा न दाखविणां-या या शेपालीचे अनेकांनी मुक्तकंठाने काैतुक केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here