” गोहत्या ” – एक कलंक….!

0
520

” गोहत्या ” – एक कलंक….!


राजूरा( चंद्रपूर) -किरण घाटे विशेष प्रतिनिधी-विदर्भातील अतिदुर्गम भाग म्हणून आेळखल्या जाणा-या राजूरा येथील मुळ निवासी तथा महाराष्ट्रातील सहजं सुचलं महिला व्यासपीठावरील काव्यकुंजच्या एक जेष्ठ सदस्या सविता संजय भाेयर यांनी “गाेहत्या एक कलंक” हा एक संक्षिप्त लेख शब्दांकित केला आहे .ताे खास वाचकांसाठी आम्ही येथे देत आहाे .
गाईला गोधन मानल्या जाते, तिची पूजा केली जाते. गाईच्या शेणाने पूर्वी आणि अजूनही ग्रामीण भागात सडा सारवण केल्या जाते. अशी ही गोमाता आमच्या सर्वांसाठी प्रिय, पुज्यनीय अशी आहे.
ग्रामीण भागात , पहाटेला अंगणात सडा पडतो, त्यावर सुंदर अशी रांगोळी, सगळीकडे फुलांचा दरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि गोठ्यात गाई वासरांचा हंबरडा….सगळ किती प्रसन्न वाटत ना ! किती प्रसन्नता घराला येते. सूर्यनारायण दारात उभा ठाकतो आणि गाईच्या दुधाची धार काढताना आपली गावाकडची आईच डोळ्यासमोर उभी राहते. ज्यांच्या गोठ्यात गाय त्यांच्या घरात नक्कीच लक्ष्मीचा वास असतो.

गाईच्या दुधात खूप मोठे फायदे असतात. गाय ही वेगवेगळ्या प्रकारचे गवत , पालापाचोळा खाते, त्यामुळे सर्वांच्या शरीरासाठी उपयुक्त अस दूध आरोग्यासाठी हितकारक असेच आहे. गाईच्या गोमूत्रात पवित्रता असते. आरोग्यासाठी उपयुक्त असणार अस गोमूत्र आहे. रासायनिक खतांपेक्षा उपयुक्त असणार अस गाईचं शेण आहे. गाई – वासरू हे घराचं शोभेच प्रतिकच आहे. फक्त गाईचे दूध मिळविण्यासाठी तिचा वापर करू नये. तर तिला प्रेमाने चारा – पाणी , खाऊ पिऊ घालणे अत्यंत गरजेचे आहे. काही लोक तर दूध मिळविण्यासाठी वासरालाच गाईच दूध पिऊ देत नाही , तर पूर्ण दूध स्वतःच काढून घेतात. गाईला जितक्या प्रेमाने कुरवाळू तितके ती सर्वांना प्रेम देईल. पुजापाठात वापरल्या जाणारे गोमूत्र, पूजेसाठी तयार होणारे पंचामृत, दुधापासून तयार झालेली मिठाई , दही, तूप, हे सर्व मिळत ते गाईच्या दुधापासूनच. अशी ही गाय म्हणजे जणू देवताच.

अशा या गोमातेला तिचा पूर्ण उपयोग करून घेऊन, तिची गरज संपल्यावर, ती निकामी झाली समजून तिला कत्तल खाण्यात विकल्या जाते. पैसासाठी इतका स्वार्थी बनलेला हा मनुष्य, गोमातेचे उपकार क्षणार्धात विसरून जातो. जेव्हा तो गाईला निकामी समजून कत्तल खाण्यात विकायला जातो..तेव्हा त्याच्या मनात एकदाही विचार येत नसावा..की जिच्यामुळे मी आज निरोगी , सुदृढ आहे. माझं संपूर्ण बालपण व आजपर्यंत तिच्या उपकाराच्या छायेत गेले, तिचीच आज हत्या करायला निघालो आहे. ज्या गोमातेने त्याला आयुष्भर सर्वकाही दिले, तिच्या शेवटच्या क्षणी तो तिला निराधार करतो..तिला विकण्याचे पाप करतो. या पवित्र मातेची हत्या करणे हा खूप मोठा अपराध आहे, कलंक आहे हे त्याला कळत नसेल का ?? पैशाच्या लोभापायी मानव प्राणी किती निष्ठुर बनतो ..आणि बाजारात तिची किंमत लावतो. या अशा निर्दयी माणसांना कधी जाग येणार ??

गाईच्या उपकारांची माणसाने परतपेढ केली पाहिजे. तिला तर प्रेमाने न्हावू घातले पाहिजे. तिची तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सेवा केली पाहिजे. पण असे न करता..बरेचसे लोक गाईला कत्तल खाण्यात विकण्यास तयार होतात. पुरातन काळापासून गाईला मान दिला गेला आहे..की गाय जेव्हा संध्याकाळी रानातून घरी परत येते , तेव्हा तिच्यासोबत लक्ष्मी येत असते. अशी पूर्वीपासून लोकांची मान्यता(समज) आहे.

गोहत्या हा अपराध आहे. त्याला संपविणे अत्यंत गरजेचे अाहे तदवंतच”गोहत्या” हा एक समाजाला लागलेला मोठा कलंक आहे.

गाईला विकसी बाजारी,
असा भिकारी का झाला !
नाही तुज दया कशी ही,
भूललासी का तू अपुल्या कर्मा !

-लेखिका-
सविता संजय भोयर
सहज सुचलं काव्यकुंज सदस्या
राजुरा , जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here