सर्व महिलांना बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत आजपासून सुरु…

328

सर्व महिलांना बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत आजपासून सुरु…


महाराष्ट्र राज्य सन 2023-2024 च्याअर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५० टक्के सवलत घोषित केली आहे.

सदर घोषणेच्या अनुषंगाने आज दिनांक १७ मार्च २०२३ आजपासुन सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळ सर्व प्रकारच्या प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे.

तसा सरकारचा जीआर निघाला आहे. त्यामुळे सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे.

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसमध्ये ५०% सवलत अनुज्ञेय बाबत निर्देश प्राप्त झाले. त्याप्रमाणे सुचना देण्यात आल्या आहे. सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत मिळणार असून ‘महिला सन्मान योजना’ या नावाने सदर योजनेला संबोधण्यात येणार आहे.

advt