माणिकगड युनिट प्रमुखाला दाखवले काळे झेंडे, निरीक्षण चमु समोर प्रदर्शन…

0
333

माणिकगड युनिट प्रमुखाला दाखवले काळे झेंडे, निरीक्षण चमु समोर प्रदर्शन…

कोरपना/प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या युनिट हेड पदावर कार्यरत राजेंद्र काबरा हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात, चर्चेत राहतात. कधी नव्हे एवढी नाराजी यांच्या तुघलकी कारभारावर दिसते. कुसंबी येथील रस्त्यावर अनधिकृत बांधकाम, पाण्याची अविरत पाणीचोरी वाणीज्य वापर, आदिवासी शेतजमीन प्रकरण, तीव्र स्फोटकामुळे परिसरात होणारे नुकसान, वन्यप्राण्याची दुखापत, पाळीव प्राण्यावर होत असलेल्या दगडाच्या जखमा, पंचक्रोषित नागरीकामध्ये वाढता कंपनी विरोधात रोष, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष, खनिज विकास निधिचा बट्ट्याबोळ, अनधिकृत बांधकाम, नोकारी ग्रामपंचायत कर आकारणी व अकृषक महसुलाची चोरी अशा अनेक विवादात माणिकगड सिमेंट कंपनी नेहमी चर्चेत राहत असली तरी स्थानिक गडचांदूर शहरात प्रदूषणामुळे जीवितास वाढता धोका, नोकारी माईन्स येथील कर्मचारी निवास गाड्यातून वाहणारे दुषित पाणी यामुळे पाळीव प्राणी व नागरिकाच्या आरोग्यावर होत असलेला परिणामाचा धसका गावकऱ्यांनी घेतला असून कंपनीने नागरिकाच्या जीवाशी खेळ मांडला आहे. आदिवासी भागातील प्रकल्पग्रस्त आदिवासी कोलाम बांधावाना एकही नोकरी दिली नाही. १८ आदिवासी बांधावाच्या जमिनी नष्ट करून बेघर केल्याने आदिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत असताना अन्याय असहाय होत असल्याने कुसुंबी माईन्स येथे शेकडो महिला पुरुषांनी प्रकल्प प्रमुख राजेंद्र काबरा हाय हाय, ४ थामाईन्स टप्पा रद्द करा, चलेजाव चलेजाव च्या घोषणा देत मुंबई येथून आलेल्या टीम समोर काळे झंडे दाखऊन निषेध व्यक्त केला. यावेळी जंगा पेंदोर, बालाजी सिडाम, पुष्पा मंगाम, संजय तालांडे, अरुण उदे, यांचेसह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here