मुंबईत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी चे दर्शन

0
384

मुंबईत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी चे दर्शन


मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
मुंबई : अवघे जग ज्याच्यापुढे नतमस्तक होते. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या त्या तथागत गौतम बुद्धांच्या २५०० वर्षापूर्वीच्या पवित्र अस्ती घेऊन ११० थायलंडचे भंतेजी यांच्या तर्फे बौद्ध भिक्खू बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी मुंबईत प्रथमच परभणी ते मुंबई अशी पदयात्री काढण्यात आली. आणि प्रत्येक ठिकाणी या पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी लाखो बुद्ध जनता एकत्र जमली होती. गेली ३० दिवस ते पायी चालत होते. त्यांच्या पायाला चालता चालता ईजा ही भरपूर झाल्या होत्या. त्यांचे मुंबईत दादर सर्कल येथे आगमन होऊन चैत्यभुमी येथे मोठ्या उत्सात समाप्ती पार पडले. सर्वांनी तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे चे दर्शन घेतले. जास्तीत जास्त संख्येने जनता या धम्म यात्रेत सहभागी होऊन “जय बुद्ध जय भीम” चे घोषणा ही करण्यात आली. या पदयात्रेत श्री. महेश सावंत, श्री. जितेंद्र कांबळे सह अन्य कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here