पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीकरिता आदर्श शाळेतील विध्यार्थीची निवड

0
475

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीकरिता आदर्श शाळेतील विध्यार्थीची निवड

यश कुळमेथे शहरी भागातून तालुक्यात दुसरा

 

 

राजुरा, 12 जाने : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत राजुरा येथील बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीकरिता झाली आहे.

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र डी. जांभुळकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, पालक प्रतिनिधी संगीता दुपारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सत्र 2019-20 मधील शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थीनी रितू अजय दुपारे, सत्र 2020-21 मधील शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थी यश रोहिदास कुळमेथे, संकेत गणपत मोहितकर, ध्रुप रवींद्र वाटेकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यश हा शहरी भागातून तालुक्यात दुसरा आहे हे विशेष. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रोशनी कांबळे यांनी केले तर आभार शिक्षिका सुनीता कोरडे यांनी मानले. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण विषयक आकांक्षा पूर्ण करून त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यावसायिक कौशल्य संपादित करण्याच्या उद्देशाने या परीक्षा घेतल्या जातात. बदलत्या काळाबरोबर अशा शैक्षणिक परीक्षांमधून प्रज्ञाशोध, गुणवत्ता विकास साधला जातो. आदर्श शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण व शिष्यवृत्ती निवड प्राप्त विद्यार्थ्यांच्या सुयशाबद्दल बा. शि. प्र.मं. चे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, सह सचिव शंकरराव काकडे, संचालक लक्ष्मणराव खडसे, अविनाश निवलकर, मधुकर जाणवे, मंगला माकोडे आदीसह मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, सारीपुत्र जांभुळकर, पर्यवेक्षक बादल बेले, वर्गशिक्षिका तथा शिषवृत्ती मार्गदर्शक ज्योती कलुरवार, रुपेश चीडे, सुनिता कोरडे व शाळेतील सर्व शिक्षकांनी यशस्वी विध्यार्थीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here