युवक काँग्रेसचा गरजू महिलांना मदतीचा हात सेवा सप्ताह’तून रोजगार निर्मितीचा प्रयत्न

0
458

युवक काँग्रेसचा गरजू महिलांना मदतीचा हात
सेवा सप्ताह’तून रोजगार निर्मितीचा प्रयत्न

गडचिरोली सुखसागर झाडे:गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी कोरोनाकाळात युवक काँग्रेसने विविध उपक्रम राबवून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांना भोजन वितरणासह रूग्णांना लागणाऱ्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या. यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘सेवा सप्ताह’चे आयोजन केले. या सप्ताहात वेगवेगळ्या दिवसी विविध घटकातील नागरिकांना साहित्याचे वितरण केले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गुरूवारी (१० जून) गरजू व प्रशिक्षित महिलांना शिलाई मशिनचे वितरण केले.
घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर कुटुंबाची होणारी तारांबळ थांबविण्यासाठी व महिलांना घरातच रोजगार निर्माण करता यावा, याकरिता युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या पुढाकारात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात ‘सात वार सात सेवा’ असे नियोजन करून सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी नियोजनानुसार साहित्याचे वितरण करण्यात आले. गुरूवारी वितरीत करण्यात आलेल्या शिलाई मशिन या अंत्यत गरजू व प्रशिक्षित महिलांनाच देण्यात आल्या. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक सतिश विधाते, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर,संजय चन्ने,प्रतीक बारसिंगे, जितेंद्र पाटील मुनघाटे,घनश्याम मुरवतकर,गौरव एनप्रेड्डीवार,विनोद धदरें,हेमंत मोहीत कर,दिलीप चोधरी,समीर ताजने,आशिष कामडी ,निखिल खोब्रागडे,गुरुदेव पगाडे, शरद निकुरे, रवी गराडे,कुणाल ताजने सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते
शिलाई मशिन लाभार्थ्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे व त्यांच्या चमूचे मनस्वी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here