समूदाय समन्वयक यांचा सत्कार सोहळा संपन्न…

0
365

समूदाय समन्वयक यांचा सत्कार सोहळा संपन्न…

मॅजिक बस संस्थेचा उपक्रम…


नांदा फाटा : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निखिलेश चौधरी यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्यात SCALE कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळा द्वारे जीवन कौशल्य विकास हा उपक्रम अविरतपणे राबविल्या जात आहे.

यामध्ये समूदाय समन्वयक हे खूप मोठी कामगिरी आपल्या गावात /शाळेत बजावत असतात. पालकांची सभा, मुलांची सत्रे, बालपंच्यात मीटिंग घेणे, इत्यादी अनेक उत्कृष्ठ कार्य ते आपल्या गावात/शाळेत करत असतात.

यासाठीच त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम नगाजी महाराज सभागृह नांदा येथे घेण्यात आला. त्यामध्ये खेळांच्या स्पर्धा, समूह नुत्य, एकल नुत्य,पथनाट्य, गीत गायन,इत्यादी कार्यक्रमच आयोजन करण्यात आले. त्यानंतर सर्व समूदाय समन्वयक यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित गावातील सरपंच पेंदोरताई, पंचायत समिती कोरपना येथे शिक्षण विस्तार अधिकारी सचिन मालवी, वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, मॅजिक बसचे ट्रेनिंग मॅनेजर संदीप राऊत व लोकमत प्रतिनिधी सतीश जमदाडे, नितेश मालेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समूदाय समन्वयक अस्मिता वाघमारे, पल्लवी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळा सहाय्यक अधिकारी मुकेश भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितसाठी मॅजिक बस कर्मचारी मोहिनी इंगळे, आशीष मेश्राम, प्रतीक्षा सहारे, मुकेश भोयर, निखिलेश चौधरी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here