गाडेगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

0
470

गाडेगाव येथे धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा

 

कोरपना, प्रविण मेश्राम
येथूनच जवळच असलेल्या गाडेगाव (विरूर) येथील बौद्ध सेवा शोभित मैत्री समीतीतफेँ गाडेगाव येथे ६५ वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच गिता राजूरकर तर या कार्यक्रमात रिपाइंचे तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे यांच्या हस्ते पटांगणातिल पंचशील ध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थित अनुयायांनी ध्वजाला सलामी देण्यात आली.
या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य दर्शन बदरे, रमेश खाडे, प्रमोद चांदेकर, पुष्पाताई बदरे, माजी सदस्या व कोरपना तालुका रिपाइंच्या महीला आघाडी अध्यक्षा शिला धोटे, रमाबाई मंडळाच्या अध्यक्षा चेतना खाडे, माजी सरपंचा शारदा झाडे, गावचे तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर नक्षिने, गौतम धोटे याची यावेळी उपस्थित होती. तसेच महिला आघाडीच्या तनुजा करमणकर, माया करमणकर, मिलिंद करमणकर, विनायक करमणकर यांनी अथक परिश्नम घेतले. प्रास्ताविक रविदास करमणकर यांनी तर संचालन पल्लवी करमणकर व आभार प्रदर्शन बदरे यांनी मानले. भिम गित, बुद्ध गिते गावून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here