उच्च शिक्षित होऊन समाजाची सेवा करा – आ. किशोर जोरगेवार

0
355

उच्च शिक्षित होऊन समाजाची सेवा करा – आ. किशोर जोरगेवार

झाडे कुणबी समाजाच्या वतीने स्नेहमीलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि परिचय मेळाव्याचे आयोजन

शिक्षित युवकच समाज घडवीत असतात. त्यामुळे आपणही शिक्षण क्षेत्रात उल्लेखणीक काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. गरजु विद्यार्थांसाठी आपण 11 अभ्यासीका तयार करत आहोत. परंतू उच्च शिक्षीत झालेला विद्यार्थी देश सोडून परदेशात निघुन जातो. ही ही वस्तु स्थिती आहे. त्यामुळे त्यांनी समाजात राहुन समाजाची सेवा करावी. तसे संस्कार समाजातील पूढा-र्यांनी आजच्या युवकांना द्यावे. झाडे कुणबी समाजातील विद्यार्थी यांनीही उच्च शिक्षीत होऊन आपल्या समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

मुल रोड येथील मानका देवी मंदिर येथे झाडे कुणबी समाजाच्या वतीने स्नेहमीलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला झाडे कुणबी समाजाचे अध्यक्ष सचिन कठाणे, ओबीसी प्रबोधनकार देवानंद मारवाडे, झाडे कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष गणपतराव ब्राम्हणकर, श्रीपतराव मटाले, विठ्ठल तवाडे, सामाजिक कार्यकर्ता अरुन फंुडे, डाॅ. शालीनी मटाले, अरविंद कोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, झाडे कुणबी समाज हा कष्टकरी समाज आहे. या समाजाने सेवेचे काम केले आहे. मात्र आता सेवेकरी समाज मागे पडत आहे. हि चिंतेची बाब आहे. अशा आयोजनात समाजाने याचे चिंतन आणि मंथन करावे, छोट्या छोट्या सेवेकरी समाजांनी एकत्रीत येत. त्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधण्याचे काम केले पाहिजे. झाडे कुणबी समाजात युवक मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या युवकांनी आता जेष्ठांच्या मार्गदर्शनात समाजाची पुढची दिक्षा ठरवीली पाहिजे. शिक्षण घ्याच, परंतु स्वयंरोजगाराकडे अधिक भर द्या असे आवाहण यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

कोरोना काळात अनेक प्रश्न निर्माण झाले. यात शिक्षणाचा मोठा प्रश्न माझ्यापूढे काही युवक घेऊन आलेत. त्यावेळी अनेकांची फि माफी आपण करुन दिली. कोरोना नंतर अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले. अशात अभ्यासीकेची फी द्यायची कुठुन हा प्रश्न एक विद्यार्थी माझ्या प्रयत्न घेऊन आला. त्यावेळी आपण मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करण्याचा निर्धार केला. यातील 7 अभ्यासिकांचे काम सुरु झाले आहे. तयार होत असलेल्या या अभ्यासिकांमध्ये गरिब गरजु विद्यार्थांना निशुल्क अभ्यास करता येणार आहे. याचाही लाभ समाजातील विद्यार्थांनी घ्यावा असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

आजच्या या आयोजनात गुणवंत विद्यार्थांचा सत्कार केला जाणार आहे. हा प्रत्येक गुणवंत विद्यार्थी समाजाच्या कामात आला पाहिजे, तुम्ही गुणवंत झालात म्हणुन समाजाने तुम्हाला दिलेली ही पावती आहे. तुम्हीही याची परतफेड करत समाजाच्या कामात पूढाकार घेतला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्रीत आला आहे. त्यामुळे येथून जातांना सकारात्मकता घेऊन जा, समाजाने दिलेले विचार घेउन जा, पूढच्या वर्षी याहुन अधिक विद्यार्थांचा याच मंचावर सत्कार केला जाईल अशी आशा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here