पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा ( रै ) येथील ग्रामस्थांची आदर्श गावाकडे वाटचाल 

0
1012

पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा ( रै ) येथील ग्रामस्थांची आदर्श गावाकडे वाटचाल 

गाँव आदर्श करण्यासाठी युवक आणि महिलांमध्ये खूप उत्साह

पोंभुर्णा प्रतिनिधी :- पॉम्भूर्णा तालुक्यातील मोहाळा ( रै ) येथे आज दिनांक 16 ऑक्टोंबर 2021 ला सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने मा. बाबासाहेब पावसे पाटील , राज्य सरचिटणीस यांचे नेतृत्वात आदर्श गाव (स्मार्ट ग्राम) बनविण्यासाठी गाँव स्तरावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच व्रुक्ष लागवड करण्यात आले असून दर महिन्याला दोनदा गाव स्वच्छ करण्याचा निर्धार महिलांनी केला असून गाव हागणदारी मुक्त , व्यसन मुक्त , शिक्षण व आरोग्य , वृक्ष लागवड करणे , गावाचे सौंदर्यीकरण , प्लास्टिक बंदी , शोषखड्डा , पाणी आडवा पाणी जिरवा , गाव स्वच्छता आणि जैविक शेती इत्यादी विषयांवर मार्गदर्शनातून चर्चा करण्यात आली. सोशल डिस्तांसिंनग ठेवून   सूजता कारेकार उपसरपंच ग्रा.प. मोहाळा ,  प्रतीभा पिदूरकर ग्रा. प. सदस्य, रजनी गौरकार ग्रा.प.सदस्य . समीर गौरकार अध्यक्ष आदर्श गाव विकास समिती ,  भास्कर गौरकार उपाध्यक्ष  आदर्श गाव विकास समिती ,  लोमेश वांढरे कोष्याध्यक्ष आदर्श गाँव विकस समिती ,  सूरज पोतराजे ग्राम संघटक ,  निलेश गौरकर ,  गणेश पिदुरकार ,  शारदा पिदुरकार , रंजु विलास कारेकार ,  अनीता गौरकार ,  पंचफुला कारेकर ,  रजनी कारेकर ,  वंदना कष्टी , नमिता बोंडे ,  मंगला गौरकार , वर्षा आत्राम , जगदीश पाचभाई , राज्य समन्वयक, सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य आणि सर्व बचत गटाच्या महिलानी सहभाग घेतला असून माझे गाव माझी जबाबदारी नुसार ग्रामीण भागातील मागासवर्गीय क्षेत्रातील मोहाळा ( रै ) गाव आदर्श करण्याचा निर्धार ग्रामस्थानी व्यक्त केला.

यावेळी उपसरपंच  सुजाता कारेकार  म्हणाले की सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून गावात स्मार्ट ग्राम चा प्रकल्प राबविण्यात येत असून याप्रकारे असेच ग्रामस्थांनी सहकार्य केले तर गावाला लवकरच स्मार्ट ग्राम चा दर्जा मिळेल. यासाठी जेवढ्या कामाची उणीव आहे ती लोक सहकार्याने भरून काढू. आणि गावाला आदर्श बनविण्यासाठी कार्यरत राहु. असे म्हंटले आहे. त्याचप्रमाणे मा. समीर गौरकार अध्यक्ष ,आदर्श गाव विकास समिती यांनी सुध्दा गाव विकासाबाबत मार्गदर्शन केले असून येत्या दोन वर्षांत आपले गाव सुंदर व स्वच्छ राहील त्यासाठी लोकामध्ये जागृती घडवून आणू. आणि महिन्यातून दोनदा गाँव स्वच्छता अभियान राबविण्यात येईल .असे म्हंटले आहे.. विशेष म्हणजे मोहाळा हे गाँव पॉम्भूर्णा पासून 8 किलोमीटर अंतरावर असून गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here