सोशल मीडिया हे प्रसिद्धीचे प्रभावी माध्यम – खास. अशोक नेते यांचे प्रतिपादन.!

0
501

सोशल मीडिया हे प्रसिद्धीचे प्रभावी माध्यम – खास. अशोक नेते यांचे प्रतिपादन.!

गडचिरोली येथे लोकसभेतील सोशल मीडिया संयोजकांची बैठक

गडचिरोली, सुखसागर झाडे

आजच्या विज्ञान / संगणकीय युगात व्हाट्सएप,फेसबुक व ट्विटर तसेच इन्स्ट्राग्राम च्या माध्यमातून एखादी माहिती काही सेकंदात हजारों लोकांपर्यंत पोहचविल्या जाऊ शकते. सोशल मिडियाच्या माध्यमातून 10-15 सेकंदात 15-20 हजार लोकांपर्यंत मेसेज पोहचविल्या जाऊ शकते. त्यामुळे तालुका-तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोशल मिडिया कार्यकर्ते जोडून त्यांच्यामार्फत भारतीय जनता पार्टी चे कार्य, केंद्र शासनाच्या जन कल्याणकारी योजना, जनहितार्थ निर्णय, महत्वाचे विषय व क्षेत्रातील खासदार- आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यन्त पोहचविण्याचे कार्य सोशल मिडिया प्रमुखांनी करावे. सोशल मिडिया हे प्रसार व प्रसिद्धी करण्याचे प्रभावी माध्यम आहे त्यामुळे योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सोशल मिडिया कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. सोशल मिडिया संयोजकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा क्षेत्रातील सोशल मीडिया संयोजक, सहसंयोजक यांची महत्वपुर्ण बैठक पार पडली. बैठकीला भाजयुमोचे जिल्हा महामंत्री संजयजी बारापात्रे, सोशल मीडिया चे लोकसभा संयोजक तथा गडचिरोली जिल्हा संयोजक आनंद खजांची, सह संयोजक अनुप अध्येंकीवार, जिल्हा सह संयोजक वैष्णवी डोंगरे, देवरी- आमगाव विधानसभा संयोजक हितेश डोंगरे, सिंदेवाही-ब्रम्हपुरी विधानसभा संयोजक हार्दिक सूचक, आरमोरी विधानसभा संयोजक गौरव नागपुरकर, अहेरी विधानसभा संयोजक विनोद जिल्हेवार, अहेरी तालुका संयोजक राकेश कोसरे, भामरागड तालुका संयोजक रंजुताई सडमेक, चिमूर तालुका संयोजक अजित सुकारे, गडचिरोली तालुका संयोजक जुगल वासेकर, शहर संयोजक हर्षल गेडाम व लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्याचे संयोजक तथा सहसंयोजक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here