एसएससीएन प्रायमरी स्कुल चंद्रपूर येथे वृक्षारोपण

0
473

एसएससीएन प्रायमरी स्कुल चंद्रपूर येथे वृक्षारोपण

 

बल्लारपूर, 9 जुलै : सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर तर्फे वनसप्ताह निमित्ताने विसापूर येथील एसएससीएन प्रायमरी स्कुल चंद्रपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

वनसप्ताह निमित्ताने सामाजिक वनीकरण विभागातर्फे ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधून 7 तारखेला सैनिकी विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी इंगळे व वनरक्षक तसेच विद्यालयातील मुख्याध्यापिका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

“मानवाने आपल्या हव्यासापोटी वनांचे अतोनात नुकसान करत घरे, शेती व उद्योगासाठी वृक्षतोड केली. याचाच परिणाम म्हणून अलीकडे मानव व वन्यजीव संघर्षात वाढ होताना दिसून येत आहे. शेती, गाव व शहरात वन्यजीवांचा वावर वाढत चालला आहे. मानवासाठी अत्यंत उपयुक्त असणारी वने वाढविणे काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या जन्मदिनी किमान एक झाड लावले तर येणाऱ्या काळात निसर्ग समतोल साधता येईल. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अनुषंगाने झाडे लावा आणि झाडे जगवा…! हा संदेश बालपणीच विद्यार्थ्यांच्या मनावर कोरता येईल”
मुख्याध्यापिका
एसएससीएन प्रायमरी स्कुल विसापूर

 

यावेळी सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, वनरक्षिका, सामाजिक कार्यकर्ता अमोल राऊत, सूरेंद्र फुसाटे, मुख्याध्यापिका सुनीता लेनगुरे, दिनेश क्षिरसागर, वर्षा कुकुडपवार, आरती मनेपल्ली, सूरज बोरघरे, रचना सिंग, नितु कश्यप, अमरीत सिंग, करिश्मा शर्मा, पल्लवी धडावे, मेनका जांभुळकर, मयुरी राजूरकर, सत्यवती बांदूरकर, नजिया कुरेशी, श्रद्धा यंगलवार, त्रेशा आईलवार, रेणुका इरगुराला, प्रियंका तुकरेल, दीप्ती सदराणी, फर्जना शेख, सविता डाहुले, नीता डाखोरे, अक्षय सिडाम, उज्वला वासेकर, ज्योस्तना नारायणवार, छाया गेडाम, किशोर रोहनकार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here