कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान तर्फे मुरुड गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0
319

कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान तर्फे मुरुड गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुरुड गावात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान च्या माध्यमातून करण्यात आले.

मुरुड गावातील नाडी तज्ञ कै. नागूअण्णा बिवलकर यांची जयंती १२ फेब्रुवारी, त्यांची आयुर्वेद चिकित्सा आणि नाडी परीक्षा भारतातील अनेक राज्यांत प्रसिद्ध होती. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गावातील एन के वराडकर हायस्कुल येथे करण्यात आले.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, स्त्रीरोग तपासणी, हिमोग्लोबिन टेस्ट आणि सामान्य चिकित्सा इ. प्रकारच्या आरोग्य तपासणीचा समावेश होता.

डॉ. सौ. धामणकर, डॉ. पिलणकर, डॉ. सौ. गरंडे , डॉ. राठोड तसेच HB टेस्टिंग साठी सूरज शिगवण आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी शिबिरात उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी प्रास्ताविकात बोलताना म्हंटले की ज्यांची जयंती आहे ते नागूअण्णा आणि ज्यांच्या प्रतिष्ठानने कार्यक्रम आयोजित केला ते कृष्णामामा हे दोघेही ‘तन समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित’ या भावनेने जगलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याचा हा वारसा आपण सर्वजण मिळून पुढे नेऊ.

या कार्यक्रमाचे आयोजन, एन के वराडकर हायस्कुलचे संचालक विवेक भावे, संजय भावे, मुख्याध्यापक गारडे मॅडम, नरवणकर सर यांच्यासह गावातील तरुण कार्यकर्ते विराज खोत, अमेय जोशी, सौरभ बोडस, विद्याधर दाबके, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी पवार, प्रणाली माने, किशोर बालेकर, राजेश सासणे, प्रेरणा राठोड, CA कौस्तुभ दाबके, डॉ. प्रतिक भांबुरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या मदतीने संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here