राष्ट्रीय एकता शिबिर पटना येथे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन

0
222

राष्ट्रीय एकता शिबिर पटना येथे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन

युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार तथा राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय पटना (बिहार व झारखंड) यांच्या संयुक्त विद्यमाने बिरला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मेसरा, पटना कॅम्पस येथे दिनांक २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय एकता शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रातील श्रीमंत, समृद्ध संस्कृती व परंपरेचे, लोककलेचे प्रदर्शन करत या शिबिरात सहभागी झालेल्या संपूर्ण भारतातील स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांचे मने जिंकली.
संपूर्ण भारतातील विविध राज्याच्या संस्कृतीचे आदानप्रदान व्हावे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या उद्देशाने शिबिराचे आयोजन भारत सरकारच्या युवा व्यवहार व खेळ मंत्रालयातर्फे दरवर्षी करण्यात येते.
या सांस्कृतिक विविधतेत महाराष्ट्राची लावणी, गोंधळ, गणेश वंदना, अफजलखान वधाचा पोवाडा, कोळीनृत्य, गोंडी नृत्य इ. सादर करत महाराष्ट्राच्या विविधांगी समृद्ध संस्कृती व परंपरेचे प्रदर्शन करत महाराष्ट्र राज्याचे नावलौकिक केले.
या शिबिरात महाराष्ट्र राज्याचा पाच मुले,पाच मुली आणि एक कार्यक्रम अधिकारी असा गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या संघात श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील तीन स्वयंसेवक सहभागी झालेले होते.
यामध्ये या संघाचे संघनायक म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की तसेच या संघात श्री शिवाजी महाविद्यालयाचे पवन चिंतलवार, कशिष रोहणे, स्नेहा येरगुडे, विद्यपीठांर्गत इतर महाविद्यालयातील अनुराज चांदेकर, गौरव झाडे, ओम पिपरे, मयुर देशमुख, शालिनी निर्मलकर, भाग्यश्री बोभाटे, प्रतीक्षा ठाकरे इ. राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक सहभागी झालेले होते.
शिबिरात बौद्धिक सत्रादरम्यान प्रा. गुरुदास बल्की यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध परंपरा यावर स्वयंसेवकाना मार्गदर्शन केले.
या स्वयंसेवकांनी मिळालेल्या संधीचे करत महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती व परंपरेचे संपूर्ण भारतातुन सहभागी झालेल्या स्वयंसेवकांसमोर प्रदर्शन केले.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय निदेशालय पुणे (महाराष्ट्र व गोवा) चे क्षेत्रीय निर्देशक मा. अजय शिंदे सर तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो कक्षाचे संचालक मा. डॉ. श्याम खंडारे व श्री शिवाजी महाविद्यालय राजुराचे सन्माननीय प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड सर यांचे मार्गदर्शन व रासेयो गोंडवाना विद्यापीठातील लिपिक श्री भीमराव उराडे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here