विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक अभिरुची वाढते : आमदार सुभाष धोटे

0
220

विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक अभिरुची वाढते : आमदार सुभाष धोटे

 

राजुरा (ता. प्र.) : ५१ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२३ – २०२४ चे आयोजन एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल, वरोडा येथे समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही संकल्पना घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती राजुराच्या शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले. सकाळी ९:३० वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. धोटे म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यात अधिक रुची घेऊन पारंगत व्हावे. विज्ञान प्रदर्शनींच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिरुचीत वाढ होते. यातूनच पुढे मोठे वैज्ञानिक घडण्याची शक्यता आहे.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, वरोडा चे सरपंच वनमालाताई काटकर, सृष्टी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पोडे,उपाध्यक्ष सुनील उरकुडे, सचिव आशिष देरकर, गटशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण, एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्या पौर्णिमा पोडे, माजी सरपंच सुनिल वांढरे, पोलीस पाटील शालिक पोडे, विजय परचाके, मनोज गौरकर, संजय हेडाऊ यासह तालुक्यातील अनेक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here